TRENDING:

Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या दिशेने

Last Updated:

Sharad Pawar Health Update: गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाहीये. सोमवारी दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बारामतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाची लगबग सुरू असताना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते पुणे शहराच्या दिशेने निघाले आहेत.
शरद पवार
शरद पवार
advertisement

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. दोन ते तीन महिन्यांपासून अनेक सार्वजनिक कार्यक्रमही त्यांनी टाळले. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. गेल्या आठवड्यातील तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेले सहयोग सोसायटीमध्ये होते. गत सप्ताहात प्रचंड दगदग झाल्याने तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

advertisement

शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी दुपारी त्यांच्या ताफा कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह पुण्याच्या दिशेने रवाना झाला. तेथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी प्राथमिक माहिती कळते आहे.

शरद पवार यांना नेमकं काय झालंय?

शरद पवार यांना खोकला आणि कफ आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शरद पवार मास्क लावून वेगळ्या गाडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. शरद पवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सकाळपासूनच गोविंदबागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी जाण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.

advertisement

रुबी हॉल रुग्णालयात शरद पवार यांना दाखल करण्यात येणार

शरद पवार पुढच्या काही मिनिटांत पुण्यात दाखल होतील. त्यांना शहरातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येईल. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे देखील आहेत.

शरद पवार यांना प्रचंड थकवा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई–पुणे प्रवास होणार सुसाट, मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला
सर्व पहा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून नेते पदाधिकारी बारामतीला येत आहेत. सहयोगला जाऊन दादांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन संबंधित सगळेच जण गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेण्याकरिता जात आहेत. जवळपास आठ दिवस हा दिनक्रम सुरू असल्याने शरद पवार यांना प्रचंड थकवा आल्याचे सांगण्यात येते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या दिशेने
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल