शरद पवार मारकडवाडीत...
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडशरद पवारांच्या सभेआधीच मारकडवाडीत राडा, काय झालं नेमकं?वाडी गावाला शरद पवार यांचा आज दौरा होता. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे मारकडवाडीत दाखल झाले.विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावात झालेलं मतदान ग्रामस्थांना मान्य नाही. या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवर मतदान होऊ शकले नाही.
advertisement
जानकर-सातपुते समर्थकांमध्ये वादावादी
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मारकडवाडी गावात ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले. मात्र, या दरम्यान, राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली.
मारकडवाडीत देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा फलक लावण्यात आला होता. या बॅनरवर 'evm हटाव, देश बचाव'चा बोर्ड लावण्यात आला. तो बॅनर सातपुते समर्थकांनी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटात वादावादी झाली.
राम सातपुतेंच्या सर्मथकांनी जानकरांना डिवचलं...
मारकडवाडीमध्ये आमदार राम सातपुते यांचे समर्थक असलेले ग्रामस्थदेखील सक्रिय झाले आहेत. त्यांनी राम सातपुते यांनी केलेला विकास दिसून येत आहे. पुन्हा एकदा निवडणुकी घ्या यापेक्षा जास्त मतांनी राम सातपुते निवडून येतील असे आव्हान त्यांनी दिले. सातपुते यांनी या ठिकाणी विकास कामे केले आहेत. त्यामुळे त्यांनाही मत मिळाले आहेत, असे राम सातपुते समर्थकांनी म्हटले. राम सातपुते यांच्या समर्थकांनी सातपुते यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या विकास कामांचे बॅनर झळकवले आहे.