TRENDING:

शरद पवार यांची राज्यसभेची उमेदवारी फिक्स, पण अर्ज भरायला जाणार नाहीत, नेमकं कारण काय?

Last Updated:

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. याच जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई : अनेक दिवसांच्या चर्चेनंतर राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शरद पवार हे गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांचे पत्रही तयार आहे. परंतु असे असले तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी आहे.
शरद पवार
शरद पवार
advertisement

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. याच जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीकडून अनेक दिवसांच्या चर्चेनंतर शरद पवार यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.

शरद पवार यांची राज्यसभेची उमेदवारी फिक्स, पण अर्ज भरायला जाणार नाहीत

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी आहे. उद्या कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवार अर्ज भरतानाची गोपनियेतीची शपथ देतील, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार अर्ज भरायला जाणार नसल्याची चर्चा आहे.

advertisement

शरद पवार यांना आजच ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना आजच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तेथून ते त्यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर गेले. अजूनही त्यांची प्रकृती तितकीशी बरी नसल्याचे कळते. हळू हळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी मोठं मन दाखवलं, काँग्रेसचेही आभार

advertisement

महाविकास आघाडी एकसंध आहे आणि राहील. शरद पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानते. निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलीच गोष्ट आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच शरद पवार पुढच्या काही दिवसांत कामाला लागतील, त्यांची प्रकृती बरी होत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा
सर्व पहा

शरद पवार हे इंडिया आघाडीतील जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या जेष्ठत्वाचा मान राखला पाहिजे. त्यांचे दिल्लीत असणे मविआसाठी हिताचे आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार यांची राज्यसभेची उमेदवारी फिक्स, पण अर्ज भरायला जाणार नाहीत, नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल