advertisement

शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा सोप्पा प्लॅन!

Last Updated:

Mumbai Tour: मायानगरी मुंबईत बॉलीवूड स्टार्सच्या घरांची सफर अवघ्या 50 रुपयांत करता येते. खास प्लॅनबाबत जाणून घेऊ.

+
mumbai

mumbai travel शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा सोप्पा प्लॅन!

मुंबई: मायानगरी मुंबई म्हटलं की खर्च हा ठरलेलाच विषय. महागाई वाढली आहे, रोजच्या प्रवासाचे आणि फिरण्याचे खर्च वाढले आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे खिशाला मोठी झळ. पण आज लोकल18 च्या माध्यमातून फक्त 50 रुपयांत करता येणाऱ्या भन्नाट सफरबाबत जाणून घेऊ. या 50 रुपयांत तुम्हाला समुद्रकिनाऱ्याची थंडगार हवा, हिरवळ असलेलं गार्डन, ऐतिहासिक किल्ला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड स्टार्सची घरं पाहण्याची संधी मिळणार आहे.
प्रवासाची सुरुवात – 20 रुपयांत रेल्वेने
समजा तुम्ही बोरिवलीहून निघत आहात. बोरिवली ते बांद्रा रिटर्न तिकीट साधारण 20 रुपयांत होतं (लोकल ट्रेनने). तुम्ही विरार–चर्चगेट या वेस्टर्न लाईनवरून बांद्रा स्टेशनला पोहोचू शकता. 50 रुपयांपैकी 20 रुपये प्रवासात गेले, आता हातात उरले 30 रुपये.
बांद्रा स्थानकावर उतरल्यावर पश्चिमेकडे बाहेर पडा. स्टेशनसमोरच बसस्थानक आहे. येथून 212 क्रमांकाची बस थेट बँडस्टँडकडे जाते. बसचे नॉन-एसी तिकीट साधारण 10 रुपये आणि एसी 12 रुपये आहे. ये-जा मिळून 20 ते 24 रुपये खर्च होतो. म्हणजेच रेल्वे आणि बस असा पूर्ण प्रवास 50 रुपयांच्या आत होतो.
advertisement
शेअरिंग रिक्षाचाही पर्याय उपलब्ध आहे. प्रति व्यक्ती 20 ते 30 रुपये भाडं घेतलं जातं. मात्र 50 रुपयांच्या बजेटमध्ये बस हा उत्तम पर्याय ठरतो.
पहिला थांबा – St. Andrew's Church
बसने ‘सेंट अँड्र्यूज चर्च’ स्टॉपला उतरल्यावर उजव्या बाजूला वळा. समोर पसरलेला सुंदर समुद्रकिनारा आणि गार वाऱ्याची झुळूक तुमचं स्वागत करते. इथंच समोर बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याचं ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ दिसतं. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येऊन फोटो काढतात. अनेकांचं स्वप्न असतं सलमानचं घर एकदा तरी पाहावं.
advertisement
चालतच बघा स्टार्सची घरं
समुद्रकिनाऱ्यावरून 5-10 मिनिटं चालत पुढे गेल्यावर तुम्हाला अभिनेत्री बबिता कपूर यांचा बंगला दिसतो. अनेकांना वाटतं की हा बंगला रेखा यांचा आहे, पण स्थानिकांच्या मते तो बबीता कपूर यांचाच आहे. याच परिसरात एका उंच इमारतीच्या टॉप फ्लोअरवर अभिनेता जॉन अब्राहम यांचं घर आहे. थोडं पुढे गेल्यावर रेखा यांचा जुना ‘बसेरा’ बंगला देखील पाहायला मिळतो. 2006 मध्ये त्यांनी हा बंगला विकल्याची माहिती स्थानिक सांगतात.
advertisement
पुढे येतो सर्वात मोठा आकर्षणबिंदू बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यांचा ‘मन्नत’ बंगला. सध्या बंगल्याचं नूतनीकरण सुरू असल्याने काही भाग झाकलेला आहे, तरीही दररोज हजारो चाहते येथे येतात. फोटो, सेल्फी आणि व्हिडिओ काढतात. स्थानिकांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की काम सुरू असल्यामुळे शाहरुख अधूनमधून येथे येताना दिसतो. रविवारी तर चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी तो गॅलरीत येतो, असंही काही स्थानिकांनी सांगितलं.
advertisement
समुद्र, गार्डन आणि ऐतिहासिक किल्ला
स्टार्सची घरं पाहिल्यानंतर पुढे चालत गेल्यावर तुम्हाला भव्य ताज लँड्स एंड हॉटेल दिसतं. त्याच्या शेजारी आहे हिरवागार आणि ऐतिहासिक परिसर Bandra Fort (वांद्रा किल्ला).
या गार्डनमध्ये सुंदर हिरवळ, वेगवेगळी फुलं, समुद्राचा नजारा आणि थंडगार वारा अनुभवायला मिळतो. गार्डन सकाळी उघडतं, दुपारी दीड वाजता बंद होतं आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत पर्यटकांसाठी खुलं असतं. उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी या ठिकाणी छान हवा अनुभवायला मिळते.
advertisement
फिरताना भूक लागली तर जवळच फूड स्टॉल्सची रांग आहे. पाणीपुरी, भेलपुरी, चाट असे मुंबई स्पेशल पदार्थ येथे मिळतात. त्यामुळे कमी बजेटमध्येही तुम्ही संध्याकाळ एन्जॉय करू शकता. फक्त 50 रुपयांत रेल्वे आणि बसचा प्रवास, समुद्रकिनाऱ्याची सफर, बॉलिवूड स्टार्सची घरं, ऐतिहासिक किल्ला आणि हिरवागार गार्डन — असा परफेक्ट पॅकेज तुम्हाला मुंबईत मिळू शकतो.
view comments
मराठी बातम्या/Travel/
शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा सोप्पा प्लॅन!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement