advertisement

उंटाच्या दुधापासून तयार होते मुंबईकरांची फेव्हरेट डिश, इराण युद्धामुळे होणार बंद!

Last Updated:

Mumbai Food: इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतातील बाजारपेठांवर आणि विशेषतः मुंबईतील इराणी कॅफेंवर जाणवू लागला आहे.

+
इराण

इराण युद्धाचा असाही फटका, मुंबईकरांना आवडीची टेस्ट भेटणार नाही, इराणी कॅफेत काय घडतंय?

मुंबई: इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतातील बाजारपेठांवर जाणवू लागला आहे. विशेषतः मुंबईतील इराणी कॅफेंना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. वाढलेला तणाव, बंदरांवरील अडथळे आणि आयात-निर्यात प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे अनेक इराणी खाद्यपदार्थ भारतात येणे बंद झाले आहे किंवा उशिरा येत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
मुंबई शहरात अनेक दशकांपासून इराणी कॅफेंची परंपरा आहे. या कॅफेंमध्ये मिळणारे खास इराणी पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. इराणी खजूर, सोहन हलवा, केसर आणि विशेषतः ‘गज’ या पदार्थांची मोठी मागणी असते. ‘गज’ हा उंटाच्या दुधापासून आणि पिस्त्यापासून तयार होणारा गोड पदार्थ इराणमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. मात्र सध्या या पदार्थांचा पुरवठा खंडित झाल्याने कॅफे मालक चिंतेत आहेत.
advertisement
दादरच्या हिंदू कॉलनी परिसरातील कॅफे कॉलनी या कॅफेचे मालक सांगतात की, “युद्धामुळे आमचे नियमित सप्लायर्स माल पाठवू शकत नाहीत. बंदरांवर माल अडकतो आहे, तर काही ठिकाणी निर्यातच थांबवण्यात आली आहे. त्यामुळे इराणमधील अनेक खास वस्तू सध्या उपलब्ध नाहीत.” त्यांच्या मते, यामुळे ग्राहकांना अपेक्षित पदार्थ देता येत नसल्याने विक्रीत घट झाली आहे.
advertisement
आयात खर्च वाढल्याने जे काही मर्यादित प्रमाणात माल येतो आहे, त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. काही कॅफेंनी पर्याय म्हणून स्थानिक बाजारातून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर सुरू केला असला, तरी चवीत आणि दर्जात फरक जाणवत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
एकूणच इराणमधील अस्थिर परिस्थितीचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतील इराणी कॅफेंवर होत असून या पारंपरिक व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिस्थिती लवकर सुधारावी आणि व्यापार पूर्ववत व्हावा अशी अपेक्षा कॅफे मालक व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
उंटाच्या दुधापासून तयार होते मुंबईकरांची फेव्हरेट डिश, इराण युद्धामुळे होणार बंद!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement