शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्रात आत्महत्येस अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विजय करंजकर यांना जबाबदार धरावं असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर त्यांनी महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग नॉट रिचेबल आहेत.
'मी उद्या तुमच्यामध्ये नसणार', शिवा तेलंग नॉट रिचेबल
advertisement
शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, माझ्या आत्महत्येला जे जबाबदार राहतील मी त्यांची नाव दिली आहे. मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यात अशी विनंती देखील त्यांनी नागरिकांना केली आहे.
शिवा तेलंग आपल्या पत्रात नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 31 मधील आत्तापर्यंत मी शिवा तेलंग आणि माझी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी शिवसेना पक्षाचा 2022 मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केले लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभा राहिलो, पक्षाचे नाव चर्चेत ठेवलं पक्षाच्या नावाने अनेक मोठे मोठे कार्यक्रम केले. पक्षाने काही जबाबदाऱ्या दिल्या त्याचा आम्ही पार पाडल्या पण माझ्या येथे माजी नगरसेवक सुदाम ढेमसे या व्यक्तीने आमचा फक्त वापरच केला आहे. पक्षाच्या प्रवेशाच्या दिवशी यांना मोठ्या निधीच्या कमिटमेंट करून त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर प्रभागामध्ये अकरा कोटी रुपयांचा निधी आला पण त्या निधीचे फक्त भूमिपूजन झाले काम कुठे पण झालं नाही आलेला निधी गेला कुठं याची पण चौकशी झाली पाहिजे माझ्याबरोबर राहून माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
