TRENDING:

'दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र', स्टेट्सला फोटो ठेवला; सेनेच्या नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, पण...

Last Updated:

सुदैवाने गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी फाटल्यामुळे पुढील अनर्थ टळला. तातडीने सेनेच्या तालुका उपप्रमुखांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड:  बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र' असं लिहित शिंदे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी फाटल्यामुळे पुढील अनर्थ टळला. तातडीने सेनेच्या तालुका उपप्रमुखांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  बीडच्या ढेकणमोहा गावात ही घटना घडली आहे. तालुक्यातील ढेकणमोहा येथील शिंदे सेनेचे उप- तालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते (वय ४६)  यांनी आज शनिवारी दुपारी म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने साडी फाटल्यानं ते खाली पडले. त्यावेळी परिसरात उपस्थितीत असलेल्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. लोकांनी धाव घेतली आणि देवकते यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

advertisement

देवकते यांनी चिठ्ठीत लिहिली नावं

देवकते यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहिली आहे. या नोटमध्ये देवकते यांनी आपल्या मृत्यूला ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी. जी. तांदळे यांना जबाबदार धरलं आहे.  देवकते यांची सुसाईड नोटची चिट्ठी सापडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मोबाईलवर फोटो आणि स्टेट्समुळे त्यांचे मित्र आणि नातेवाईक हादरून गेले होते.

advertisement

व्हॉट्सॲप स्टेट्सवर चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो

आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी देवकते यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो ठेवला होता. “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र!” असे लिहीत त्यांनी आपल्या मृत्यूला ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी. जी. तांदळे यांना जबाबदार धरलं आहे. या स्टेट्समुळे एकच खळबळ उडाली. लोकांनी सगळीकडे शोध घेतला असता ते म्हसोबा फाटा परिसरात असल्याचं कळालं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

भारत देवकते यांनी स्टेट्समधील चिठ्ठीत नमूद केलं आहे की, “मी गावातील गायगोठा, विहीर, शेततळे यांसारखी कामे नि:शुल्क दरात करण्याचे ठरविलं होतं. मात्र, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना हे मान्य नव्हतं. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे.” या दोघांना माझ्या मृत्यूसाठी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिठ्ठीतून देवकते यांनी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र', स्टेट्सला फोटो ठेवला; सेनेच्या नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल