राजन शिरोडकर यांनी मनसेच्या स्थापनेपासून पक्षासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र काही कारणांनी त्यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजन शिरोडकर यांचे चिरंजीव आदित्य शिरोडकर हे शिवसेना ठाकरे गटात पुणे सह संपर्कप्रमुख आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही राजन शिरोडकर यांनी काम केले आहे. १९९५ साली युती सरकारच्या कार्यकाळात राजन शिरोडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष होते.
advertisement
राजन शिरोडकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची दादर पश्चिम कुंभारवाडा येथे आज सायंकाळी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन-चार दिवसांत सभा होईल, अशी माहिती आहे.
कोण होते राजन शिरोडकर?
राजन शिरोडकर हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते होते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी काम केले होते
हिंदुत्वाच्या विचारांनी भारलेले आणि बाळासाहेबांच्या वाणीच्या प्रभावाने ते शिवसेना पक्षात आले
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे काम केले, पक्षविस्तार केला
१९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेबांनी शिरोडकर यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद दिले
राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर ते मनसेकडे आकृष्ट झाले
मनसेच्या स्थापनेत, पक्षाच्या वाटचालीत शिरोडकर यांचा मोठा वाटा होता.
