नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविणे अपेक्षित होते मात्र युती आणि आघाडीच्या धर्माला तिलांजी देत आपल्या सोयीनुसार कट्टर विरोधी असलेल्या पक्षा सोबत युती, आघाडी केल्याचे दिसून येत आहे, अशीच एका युती येवल्यात झाली असून इथं शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन थेट शरद पवार राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आहे.
advertisement
या ठिकाणी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे शिवसेनेचे रुपेश दराडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात एंट्री केली. भुसे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर प्रचार रॅलीत ही सहभागी झाले. त्यांच्या सोबत शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी देखील होते. यावेळी मंत्री भुसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता शहराच्या विकासाबाबत जोरदार टीका केली.
अजित पवार राष्ट्रवादी ऐवजी युती न करता शरद पवार राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय का घेण्यात आला, असे विचारल्यावर येवल्यात शिवसेनेची ताकत असताना उचित मान देण्यात आला नाही म्हणून दुसरी राष्ट्रवादीसोबत युती केल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितलं.
