नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनीषा वाघमारे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कळंब तालुक्यातील देवळाली गावात त्यांच्या सांगता रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला होता आणि हातात धगधगती 'मशाल' घेऊन रॅली सुरू होती.
या रॅलीदरम्यान अचानक मनीषा वाघमारे यांचा पाय अडकला आणि त्या तोल जाऊन पडल्या. याच वेळी त्यांच्या हातातील पेटत्या मशालीतील गरम तेल त्यांच्या अंगावर सांडले. हे तेल अंगावर उडाल्याने त्यांचे हात आणि पाय गंभीररित्या भाजले.
advertisement
नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
या घटनेनंतर रॅलीत एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी तातडीने मनीषा वाघमारे यांना धाराशिव येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्या गंभीररीत्या भाजल्या असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
