रवींद्र करलकर यांच्या घरातील कोंबडीने काही दिवसांपूर्वी अंडी दिली होती. त्यातून पिल्लांचा जन्म झाला. मात्र त्यातील एका पिल्लाकडे पाहिल्यावर घरातील सदस्यांचं लक्ष वेधलं गेलं, कारण त्या पिल्लाला दोन नव्हे, तर तीन पाय आहेत. पहिल्यांदा कोणी तरी नजर चुकवली असेल, असा समज झाला. पण नंतर बारकाईने पाहिल्यावर ही बाब खरी असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
या तीन पायांच्या पिल्लाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. गावातील लोकांनी पिल्लू पाहण्यासाठी करलकर यांच्या घरी भेट देण्यास सुरुवात केली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा....
हे पिल्लू पूर्णतः सुखरूप असून इतर पिल्लांप्रमाणेच खेळतं, खातं आणि वावरतं. अतिरिक्त पाय असूनही त्याच्या हालचालींवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, प्राणिशास्त्राच्या दृष्टीने हे एक Genetic mutation समजले जाऊ शकते. मात्र ग्रामीण भागात अशा घटना घडल्या की त्या अनेकदा अंधश्रद्धा आणि समजुतींशी जोडल्या जातात. सध्या हे तीन पायांचे पिल्लू देवली काळेथर गावासाठी एक विशेष आकर्षण बनले आहे.
