TRENDING:

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सोडला साप, मुंब्य्राच्या तरुणाचा प्रताप, VIDEO व्हायरल

Last Updated:

मुंबई ते सोलापूर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या सी-16 कोचमधील शौचालयात साप आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर:  मुंबई सोलापूर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये साप सोडून प्रवाशांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. मुंब्रा इथून एका माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबई ते सोलापूर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या सी-16 कोचमधील शौचालयात साप आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधित शौचालय तात्काळ बंद करण्यात आलं होतं. सोलापूर स्थानकावर सापाला सुरक्षित पकडण्यात आलं. पण, जेव्हा सीसीटीव्ही तपासात एका व्यक्तीने जाणीवपूर्वक शौचालयात साप ठेवत असल्याचं स्पष्ट झालं.

advertisement

त्यानुसार रेल्वे कायदा १९८९ अंतर्गत कलम १४५(ब), १४७ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफ पथकाने मुंब्रा येथून ३७ वर्षीय संशयिताला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याने हा साप का आणि कशासाठी सोडला हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही. माात्र, हा तरुण नशेबाज असल्याचं बोललं जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

आरोपीला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची दंडाधिकारी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा वेगाने उलगडा करत आरपीएफने प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची आपली तत्परता पुन्हा सिद्ध केली आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सोडला साप, मुंब्य्राच्या तरुणाचा प्रताप, VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल