श्रावणी ओगसिद्ध कोटे (९) असे मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता नऊ वर्षांच्या मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्यात पुरल्याची माहिती गावच्या पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती मंद्रूप पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
पोलिसांनी वस्तीवर जाऊन पाहणी केली. मुलीचे वडील ओगसिध्द रेवणसिध्द कोटे याला विचारले. तेव्हा त्यांनी मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाल्याचं त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्यात पुरल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. गुरुवारी रात्री दहानंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
एका नऊ वर्षांच्या मुलीला बापानेच अशाप्रकारे पुरल्याने परिसरात खळबळ उडाली आहेत. बापानेच तिची हत्या केली का? की तिचा नरबळी देण्यात आला, याबाबत विविध प्रकारचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.