मिळालेल्या माहितीनुसार, अपघाता मृत झालेला शाळकरी मुलाचे नाव अर्णव सोनवणे आहे. तो 12 वर्षाचा असून इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गाला अंडरपास रस्ता न दिल्याने मुलाचा अपघात झाल्याचा नागरिकांनी आरोप केलाआहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. शवविच्छेदनासाठी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये अर्णव शिकत होता.
advertisement
रस्ता सुरक्षेचे तीन तेरा वाजले
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून परिसरातील नागरिकांनी रस्ता अडवून ठेवत आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून रस्ता सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे.
मुंबई सोमवारी रात्री हादरली
मुंबई सोमवारी रात्री हादरली. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्याचवेळी बसने काही नागरिकांना देखील चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चकवा देण्यासाठी आरोपीला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन न जाता टॅक्सीतून हजर केले. 21 डिसेंबरपर्यंत आरोपी संजय मोरेला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.