विंचूर कंदलगाव रस्त्यावरील शेतात चन्नाप्पा बिराजदार हे कुटुंबासह एकत्र राहतात. त्यांना राजकुमार आणि सचिन बिराजदार हे मुले आहेत. सचिन बिराजदार याचे सांगली येथील प्रतिज्ञा हिच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. महिन्यांचा शिवांश हा मुलगा आहे. सचिन मुलगा शिवांशला घेऊन बाहेर खेळवत होता. आंघोळ झाल्यानंतर प्रतिज्ञा ही खोलीत गेली. पण उशीर झाला तरी ती बाहेर आली नाही.
advertisement
तेव्हा सचिन याने तिला दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सचिन याने शेतातील आई-वडिलांना हाक मारून बोलावून घेतले. सर्वांनी दरवाजा तोडून पाहिले तर खोलीतील पलंगाच्या वरील अँगलला तिने साडीने गळफास घेतला होता.
त्यानंतर गावातील लोकांनी तत्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर अकस्मात मयत म्हणून नोंद केली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. मंद्रूप पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.