टोकाचं पाऊल का उचललं?
चित्रा कविराज उर्फ दत्तात्रय हाके, दोन वर्षीय स्वराज्य कविराज हाके तर पाच वर्षे पृथ्वीराज कविराज हाके असे मृत झालेल्यांची नावे, चित्रा आणि स्वराज्य यांचे मृतदेह सापडले तर पृथ्वीराज याचा मृतदेह सापडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. चित्र हाके यांनी पहिला मुलगा गतिमंद तर दुसरा मुलगा कमी ऐकू येत असल्याच्या तणावातून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. हाके या आपल्या पतीसह वांगी गावातील वस्तीवर राहतात, चित्रा हाके यांना एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.
advertisement
50 ते 60 फूट विहिरीत उडी
मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतीमंद असल्यामुळे मोठा खर्च होत होता तर दुसरा स्वराज्याला कमी ऐकू येत असल्यामुळे चित्र हाके यांनी टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चित्रा हाके यांनी शेतातील 50 ते 60 फूट विहिरीत उडी घेऊन दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे. त्यानंतर आता सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद सुरू झाली आहे.
दरम्यान, खाऊन पिऊन सुखी संसार, पण टोकाचं पाऊल उचलण्याचं दुसरं कारण काय असावं? असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणता अँगल आहे का? यावर देखील पोलीस तपास करत आहेत.