समोर आलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील पाथरी गावात शुक्रवार मध्यरात्री चोरी झाली. आज शनिवारी पहाटे घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार पद्मिनी गायकवाड यांचे पुत्र हे वाशीम जिल्ह्यात न्यायदंडधिकारी आहेत. त्यांच्या बार्शीतल्या पाथरी येथे मुळगावी धार्मिक कार्यक्रामच्या निमित्ताने ते आपल्या पत्नी आणि मुलासह आले होते.
advertisement
घरातून काय लंपास झालं?
धार्मिक कार्यक्रम संपवून ते कोल्हापूरला देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या पत्नी आणि मुलांचे दागिने त्यांनी पाथरी येथील घरीच ठेवले होते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून बेडरूममध्ये ठेवलेले 15 तोळे सोने आणि रोख 5 हजार रुपये असे एकूण 12 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासास वेग दिला आहे.
चोरट्यांनी लंपास केलं सोनं
घरात चोरी झाली त्यावेळी न्यायाधिशांची आई घरी हॉलमध्ये झोपली होती. सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडा पाहून त्यांनी किचन आणि बेडरुमकडे धाव घेतली. बेडरूममधीलल फर्निचर, कपाटातील कपडे आणि इतर साहित्य बाहेर काढले होते. एवढच नाही तर पर्स देखील बाहेर पडली होती. त्यातील पाच हजार रुपये आणि गळ्यातील मण्याची पोत दिसून आली नाही. सून आणि मुलगा देवदर्शनाला जाताना त्यांनी ज्वारीच्या कोटीमध्ये दागिन्यांचा डबा ठेवला होता. त्यामध्ये दागिने आणि अंगठ्या होत्या तो देखील चोरट्यांनी लंपास केला होत, अशी तक्रार देण्यात आली आहे.