डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून मनीषा माने यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महिला कामगाराच्या धमकीला बळी पडून डॉ. वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिकृदृष्ट्या सांगितले जात आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
महिला कर्मचारी मनिषा यांच्याकडून मानसिक दबाव?
advertisement
डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. डॉ. वळसंगकर यांनी आतापर्यंत मेंदूसंबंधित हजारो रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. मेंदू विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉ. शिरीष वळसंगकर यांचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात नाव होते. मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचारी मनिषा यांच्याकडून मानसिक दबाव दिला जात असल्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात मनीषा माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मनीषा माने या डॉ. वळसंगकर यांच्यासोबत २५ वर्षांपासून काम करीत होत्या
मनीषा माने ह्या गेल्या २००८ पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. मनीषा माने यांच्याकडून डॉ. वळसंगकर यांना पगार कपात होत असल्यामुळे १७ एप्रिल २०२५ रोजी मेल केला गेला. त्यामध्ये आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. डॉक्टर वळसंगकर यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवल्यानंतर माने यांनी त्यांची माफी मागितली. मात्र त्यानंतर डॉक्टर वळसंगकर स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली असे या एफआयआरमध्ये म्हणले आहे. मनीषा माने यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या अशिलाला अडकविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सत्य परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मनीषा यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपल्या स्वतःच्या रिवाल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहत्या घरी बेडरूममधील वॉशरूममध्ये आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होत होते, याकडे सगळ्यांच्या नजरा असतील.