नेमका आरोप काय?
बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर शिंदे यांचा भाचा राहुल सरवदे याने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुलच्या दाव्यानुसार, बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हातात तलवार, कोयता आणि काठ्यांसारखी घातक शस्त्रे घेऊन शिंदे यांच्या घरात घुसून मारहाण केली.
निवडणुकीच्या वादातून राडा
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी घरात घुसून "तुम्ही आमच्या विरोधात निवडणुकीत उभे राहू नका, तुमच्यामुळे आम्हाला उमेदवारी मागे घ्यावी लागत आहे," असे म्हणत धमकावले. या वादातून फिर्यादीचे मामा शंकर शिंदे, मामी माजी नगरसेविका शालन शिंदे आणि आतिष शिंदे यांना मारहाण करून जखमी करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
मृत सरवदे यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल
राहुल सरवदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील एकूण १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात मृत बाळासाहेब सरवदे, दादासाहेब सरवदे, विनोद सरवदे, रवी सरवदे, श्रीकांत सरवदे, बाजीराव सरवदे, आदित्य सरवदे, आशिष शिंदे आणि बाबा सरवदे आणि इतर एकजण असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांची कायदेशीर कारवाई
जेलरोड पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. एका बाजूला मनसे पदाधिकाऱ्याची हत्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच मृत व्यक्तीच्या कुटुंबावर झालेला प्रति-गुन्हा दाखल झाल्याने सोलापूरात राजकीय वातावरण तापलं आहे.
