पण अर्ज मागे घेऊनही शंकर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपमानास्पद स्टेटस ठेवलं. तसेच वाद उकरून काढला. याच वादातून बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येपर्यंत असं काही होईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमी प्रमाणे आपल्या दोन्ही मुलींना स्वत:च्या हाताने भरवलं होतं. यानंतर ते घरातून बाहेर पडले. मात्र दुपारी रक्ताने माखलेला मृतदेह बघून दोन्ही चिमुकल्या मुलींनी हंबरडा फोडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
advertisement
नेमकं काय घडलं?
जोशी गल्लीत झालेल्या हत्याकांडातील मृत बाळासाहेब सरवदे यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी आराध्या इयत्ता पहिलीत शिकत आहे, तर दुसरी लहान मुलगी त्रिशा ही साडेतीन वर्षांची आहे. हत्या होण्यापूर्वी सकाळी बाळासाहेबांनी आपल्या लाडक्या मुलींना स्वतःच्या हाताने घास भरवला होता. त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर ते घराबाहेर पडले. मात्र, दुपारी अचानक आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आराध्या अन् त्रिशाने एकच हंबरडा फोडला. ही दुर्दैवी घटना पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
मृत बाळासाहेब सरवदे यांची पत्नी वंदना यांचेही अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्या जोरजोरात रडत असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुली प्रचंड घाबरलेल्या. दोन्ही मुली आपल्या आजीसोबत होत्या, तर नातेवाईक वंदना यांना धीर देताना दिसले. जोशी गल्लीतील बोरामणी नाक्याजवळील श्री इंद्र भवानी देवी मंदिराजवळ बाळासाहेब सरवदे यांचे घर आहे. घरासमोर सर्व नातेवाईक जमलेले होते. परिसरात प्रचंड शोकाकुल वातावरण पसरले आहे.
