करमाळा तालुक्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. जिल्हा प्रशासन आणि एनएडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. यावेळी नागरिकांना वाचवताना करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात अडकलेल्या 90 जणांचे रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट मार्गाचा अंदाज न आल्याने पाण्यात बोट अडकली होती.
संगोबा मंदिरातील लोकांना रेस्क्यू बोटनं काढताना अडकलेली बोट पंक्चर झाली. रेस्क्यू टीमच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी बाहेर उड्या टाकल्या. त्याचवेळी बोटमध्ये बसलेल्या दोन पुरूष, एक महिला आणि मुलाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने थर्माकॉल प्लेटवर बसवून मंदिरात नेण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
advertisement
सोलापुरात शाळांना सुट्टी
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना देण्यात जाहीर केलंय. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्णय घेण्यात आला निर्णय असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने
दरम्यान, सोलापूर रेल्वे विभागातील सीना नदीवरील दोन रेल्वे पूल ओलांड्यांमध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमारेषेवर पोहोचली आहे. त्यामुळे पुढील रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित अंतर अत्यंत कमी असल्याचं स्पष्ट दिसून येते. त्यामुळे गाड्यांचा वेग 30 किमी प्रतितास इतका कमी करण्यात आलेला आहे. याशिवाय मार्गातील अनेक स्थानकांपर्यंत रस्तामार्गाने पोहोचणे सध्या शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करता येईल का याची शक्यता तपासावी. कारण दौंड-वाडी हा मार्ग राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, अशी माहिती सोलापूर मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.