नवरात्राची तिसरी माळ : तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी? काय आहे महत्त्व? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसांत आदिमायेच्या नऊ स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. बुधवारी 24 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्राचा तिसरा दिवस असून या दिवशी दुर्गेच्या चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.
मुंबई: चातुर्मासातील अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला यंदा उत्साहात सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदमय वातावरण आहे. प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसांत आदिमायेच्या नऊ स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. बुधवारी 24 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्राचा तिसरा दिवस असून या दिवशी दुर्गेच्या चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीच्या पूजनाचे महत्त्व, पूजाविधी आणि नैवेद्याबद्दल आदित्य जोशी गुरुजींनी लोकल 18 सोबत संवाद साधताना सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
चंद्रघंटा देवीचे स्वरूप आणि महत्त्व
चंद्राच्या आकाराच्या घंटांनी सजलेले दागिने परिधान केलेल्या देवीला चंद्रघंटा म्हणतात. चंद्र मानवी मनाचे प्रतीक आहे, तर घंटेचा नाद मनाला सजग करतो. देवीच्या नामस्मरणाने मन एकाग्र होते आणि सजगता, खंबीरपणा आणि आकर्षकता वाढते.
advertisement
पूजनविधी आणि नैवेद्य
सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. व्रताचा संकल्प करून देवीचे षोडशोपचार पूजन करावे. पूजनावेळी पिवळ्या किंवा सोनेरी वस्त्रे परिधान करणे श्रेष्ठ मानले जाते. देवीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. विशेषतः खीर आणि बर्फी. मध आणि लोण्याचा नैवेद्यही अर्पण करावा. मोगरा, जाई किंवा जुईच्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. चंद्रघंटा देवीच्या भक्तिभावाने पूजनाने मानसिक शक्ती, संयम आणि धैर्य लाभते, असे गुरुजींनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 8:02 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्राची तिसरी माळ : तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी? काय आहे महत्त्व? Video