Weather Alert : महाराष्ट्रासाठी 6 दिवस धोक्याचे, अतिवृष्टी होणार; पंजाबराव डख यांनी दिला इशारा

Last Updated:
राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला असून, 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन कमी दाबाची प्रणाली डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
1/7
राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

advertisement
2/7
अशातच राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला असून, 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन कमी दाबाची प्रणाली डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे, असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं.

3/7
गेल्या 24 तासांत बीडच्या पाटोदा येथे 150 मिमी पावसाची नोंद झाली असून, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि संभाजीनगर भागातही जोरदार पाऊस झाला आहे.

4/7
23 सप्टेंबर रोजी नाशिक, सोलापूर, लातूर, परभणीसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होऊन पूर्व विदर्भात मध्यम पाऊस होईल.

5/7
25 सप्टेंबर रोजी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर भागांत मुसळधार पाऊस होईल. 26-27 सप्टेंबर रोजी पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेडसह अनेक जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी 150 मिमीहून अधिक पाऊस होऊ शकतो.

6/7
28 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेला मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो.

7/7
शेतकरी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात. पूरस्थितीचा धोका असल्यामुळे सतर्क राहा, असंही हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement