BMC Election 2026: सिनेसृष्टी गाजवली, आता राजकारणात दमदार एन्ट्री! मराठमोळी अभिनेत्री झाली नगरसेवक

Last Updated:
रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आता राजकारणाच्या खऱ्याखुऱ्या रिंगणातही बाजी मारली आहे.
1/7
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनी आज अनेकांचे धाबे दणाणले आहेत; पण एका निकालाने मात्र संपूर्ण सिनेसृष्टीचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे प्रभाग क्रमांक २५ ची लढत.

advertisement
2/7
रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आता राजकारणाच्या खऱ्याखुऱ्या रिंगणातही बाजी मारली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या निशा यांनी सर्व अडथळे पार करत विजय मिळवला आहे.

3/7
निशा परुळेकर हे नाव मराठी रसिकांसाठी नवीन नाही. भरत जाधव यांच्यासोबत 'सही रे सही' सारख्या अजरामर नाटकात त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. इतकंच नाही, तर 'महानायक' आणि 'शिमणा' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी मोठा पडदा गाजवला.

4/7
छोट्या पडद्यावरही त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे; विशेषतः 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकेत त्यांनी साकारलेली महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अभिनयाच्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या त्या भाजप सांस्कृतिक आघाडीच्या सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

5/7
यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती झाली होती. या युतीच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक २५ हा भाजपच्या वाट्याला आला. भाजपने इथून निशा परुळेकर यांच्यावर विश्वास टाकला.

6/7
मात्र, ही जागा सेनेला न मिळाल्याने स्थानिक शिवसेना नेते शेखर शेरे नाराज झाले. त्यांनी थेट अपक्ष अर्ज दाखल करून निशा यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. युतीतल्याच बंडखोरीमुळे निशा यांची वाट बिकट झाली होती; पण मतदारांनी त्यांच्या पारड्यात कौल देऊन निशाच खऱ्या विजेत्या आहेत हे सिद्ध केलं.

7/7
मुंबईच्या २२७ जागांच्या रणसंग्रामात भाजपने १३७ जागांवर आपलं नशीब आजमावलं, तर शिंदे गटाच्या वाट्याला ९० जागा आल्या होत्या. वॉर्ड २५ मध्ये झालेली ही तिरंगी लढत अत्यंत चुरशीची ठरली. निशा परुळेकर यांनी केवळ आपल्या ग्लॅमरच्या जोरावर नाही, तर भाजपच्या कार्यकर्त्यांची फळी आणि घराघरांत पोहोचलेला आपला चेहरा यांच्या जोरावर हा विजय मिळवला आहे.

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement