Election : नगरसेवकाने काम नाही केलं तर...; तक्रार कुठे करायची, निवडणुकीनंतर मतदारांकडे काय अधिकार?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Municipal Corporation Election Result 2026 Winner : निवडणुकीत भरघोस मतं देऊन नगरसेवक निवडून तर दिला. पण त्याने नंतर कामंच केली नाहीत तर दुसरा नगरसेवक निवडून देण्यासाठी पुढील 5 वर्षे निवडणुकीची वाट बघायची, कुणाकडे जायचं, कुठे तक्रार करायची? असS प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
नगरसेवक म्हणजे महापालिका, नगरपालिकेतील निवडून आलेला लोकप्रतिनिधी. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा दैनंदिन नागरी प्रश्नांवर नागरिक थेट नगरसेवकाकडे अपेक्षा ठेवतात. वॉर्डमधील नागरिकांच्या समस्या मांडणं, महापालिका सभांमध्ये निर्णय प्रक्रियेत भाग घेणं, विकासकामांसाठी शिफारसी करणं प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून दबाव ठेवणं ही नगरसेवकांची मुख्य कामं आहेत.
advertisement
advertisement
advertisement
सेक्शन 13 नुसार राज्य सरकारला स्वतःहून किंवा महानगरपालिकेच्या शिफारशीवर नगरसेवकाला पदावरून हटवण्याचा अधिकार आहे. कर्तव्ये नीट न पार पाडणं, निष्क्रियता, सार्वजनिक हिताविरुद्ध वर्तन अशी कोणतीही कारणे असू शकतात. महापालिकेने तीन-चतुर्थांश बहुमताने ठराव मंजूर केल्यास तो ठराव राज्य सरकारकडे पाठवला जाऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
RTI ही कायदेशीर आणि प्रभावी शस्त्र आहे. RTI च्या माध्यमातून नागरिक वॉर्डसाठी किती निधी मंजूर झाला? कोणती कामे प्रस्तावित होती? ती का झाली नाहीत? नगरसेवकाने कोणती शिफारस केली? हे विचारू शकता. जर नगरसेवक आणि प्रशासन दोघंही निष्क्रिय असतील. मूलभूत नागरी सुविधा धोक्यात येत असतील तर नागरिक किंवा सामाजिक संस्था मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल करू शकतात. न्यायालय प्रशासनाला निर्देश देऊ शकतं.
advertisement









