Mumbai Crime: लग्नाच्या 2 वर्षांनंतर सासरच्यांचा खरा चेहरा उघड, विवाहितेसोबत केलं भयंकर कृत्य
Last Updated:
Mumbai Crime News : लग्नानंतर सुखी संसाराच स्वप्न पाहणाऱ्या विवाहितेच्या आयुष्यात भयंकर घटना घडते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात लग्नानंतर एका विवाहित महिलेसोबत असं काही घडतं की सर्व शहर सुन्न झालं आहे. सध्या आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी सुरु केली आहे.
हसतं-खेळतं घर झालं नरक
मिळालेल्या माहितीनुसार, मूल होत नसल्याच्या कारणावरून एका 28 वर्षांच्या महिलेचा सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी एका कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.
लग्नानंतर दोन वर्षांनी बदलले वातावरण
पीडित महिला शमीमबानो मोहम्मद शमीम शहा सध्या मालाडमधील मालवणी परिसरात तिच्या बहिणीकडे राहत आहे. तिचा विवाह जानेवारी 2018 मध्ये मोहम्मद शमीम शहा याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही शमीमबानोला मूल झाले नाही. याच कारणावरून सासरच्या मंडळींकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येऊ लागला.
advertisement
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिचा पती मोहम्मद शमीम शहा तसेच नणंद शबनम शहा, मैजबीन शहा, रोशनजहाँ शहा, सना खातून शहा आणि सासू सबुत्रिसा शहा हे वारंवार तिचा अपमान करत होते. मूल होत नसल्याचे कारण देत तिच्यावर मानसिक त्रास दिला जात होता. तसेच काही वेळा तिच्याशी मारहाणही केल्याचा आरोप तिने केला आहे.
advertisement
सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल
या सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर मालवणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालवणी पोलिस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 12:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: लग्नाच्या 2 वर्षांनंतर सासरच्यांचा खरा चेहरा उघड, विवाहितेसोबत केलं भयंकर कृत्य









