Shivsena Eknath Shinde : स्वबळावर लढलेल्या एकमेव महापालिकेमध्ये शिंदेंना दिलासा, शिवसेना बहुमताजवळ, भाजपला धक्का!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आता हाती यायला सुरूवात झाली आहे. या महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना युतीने जोरदार मुसंडी मारली आहे.
उल्हासनगर : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आता हाती यायला सुरूवात झाली आहे. या महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना युतीने जोरदार मुसंडी मारली आहे, तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवारांना या निवडणुकीमध्ये जोरदार धक्का बसला आहे. राज्यातल्या बहुतेक महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे, पण ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये शिवसेनेने भाजपलाही पिछाडीवर टाकलं आहे.
ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना 34 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपला 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागेवर आघाडी मिळाली आहे. 131 जागांच्या ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये लढले होते, ज्यात शिवेसनेने जास्त जागांवर निवडणूक लढली.
दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेल्या 122 जागांपैकी शिवसेना 51 जागांवर, भाजप 41 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 8 जागांवर, काँग्रेस, 2, मनसे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीमध्येही शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणूक लढवत होते.
advertisement
उल्हासनगरमध्येही शिवसेना आघाडीवर
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीशिवाय उल्हासनगरमध्येही शिवसेना बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. विशेष म्हणजे उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढले नव्हते. सध्या उल्हासनगरच्या 78 जागांपैकी शिवसेना 36 जागांवर, भाजप 30 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 2 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. उल्हासनगरमध्ये बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे, त्यामुळे शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी 4 जागांची गरज आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना ही ओमी कलानी यांच्या पक्षासोबत युती करून लढत आहे.
advertisement
उल्हानगरमध्ये शिवसेनेला मिळालेलं हे यश म्हणजे भाजपसाठी धक्का मानलं जात आहे, कारण याआधी 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला 32, शिवसेनेला 25 आणि इतर पक्षांना 11 जागांवर यश मिळालं होतं.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Ulhasnagar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 5:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena Eknath Shinde : स्वबळावर लढलेल्या एकमेव महापालिकेमध्ये शिंदेंना दिलासा, शिवसेना बहुमताजवळ, भाजपला धक्का!









