बायको, मुलगा प्रचारात चप्पल न घालता अनवाणी पायांनी फिरले! शिंदेंचा शिलेदार तुरुंगातून लढला अन् जिंकला

Last Updated:

Jalgaon Election 2026 : जळगावच्या राजकारणात धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगात असतानाच निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला आहे.

jalgaon election 2025
jalgaon election 2025
जळगाव : जळगावच्या राजकारणात धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगात असतानाच निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत कोल्हे कुटुंबीयांनी एकत्रितपणे यशाची हॅट्ट्रिक साधली आहे. ललित कोल्हे यांच्यासह पियुष कोल्हे आणि सिंधू कोल्हे हे तिघेही विजयी झाले असून, या निकालामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निकालानंतर झाले भावूक
निकाल जाहीर होताच कोल्हे कुटुंबीयांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विजयाचा आनंद साजरा करताना भावनिक सूर अधिक ठळकपणे दिसून आला. ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “ललित सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर अतिशय घृणास्पद आरोप लावण्यात आले आहेत. तरीही मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी मोठा आधार आहे. मताच्या माध्यमातून जनतेने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. हा विजय म्हणजे मतदारांनी दिलेला प्रेमाचा आणि विश्वासाचा कौल आहे.”
advertisement
सरिता कोल्हे पुढे म्हणाल्या की, “माझा नवरा, मुलगा आणि सासू तिघेही एकाच वेळी निवडून आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ललित यांना अटक झाल्यापासून आम्ही प्रचारादरम्यान पादत्राणं घातली नाहीत. अन्यायाच्या विरोधात हा आमचा शांत मार्ग होता. ललित तुरुंगातून परतल्यानंतरच पादत्राणं घालीन, असा निर्धार केला होता. आज मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून सगळं शक्य करून दाखवलं आहे.”
advertisement
काय होता आरोप?
दरम्यान, ललित कोल्हे हे बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. अटक झाल्यानंतर नऊ दिवस ते पोलीस कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याने प्रशासनाने त्यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी केली आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही मतदारांनी कोल्हे यांना निवडून दिल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
advertisement
ललित कोल्हे यांचा राजकीय प्रवासही तितकाच लक्षवेधी राहिला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मनसे, भाजप आणि खान्देश विकास आघाडी अशा विविध पक्षांत काम केले. राजकीय वाटचालीतील अनेक वळणांनंतर अखेर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत स्थिरावले. शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी जळगावमधील संघटन मजबूत करण्यावर भर दिला होता. त्याचा फायदा या निवडणुकीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
advertisement
एकूणच, तुरुंगात असतानाही मिळालेला विजय, कुटुंबातील तिघांचा एकत्रित यशस्वी निकाल आणि त्यामागील भावनिक पार्श्वभूमी यामुळे ललित कोल्हे आणि कोल्हे कुटुंबीयांचा विजय केवळ राजकीय नसून तो जनतेच्या भावनांचा आरसा ठरला आहे. हा निकाल जळगावच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायको, मुलगा प्रचारात चप्पल न घालता अनवाणी पायांनी फिरले! शिंदेंचा शिलेदार तुरुंगातून लढला अन् जिंकला
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement