Shivsena BJP : कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा 'अंबरनाथ पॅटर्न', निकालाआधीच भाजपचे मनसुबे उधळले!

Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा 'अंबरनाथ पॅटर्न', निकालाआधीच भाजपचे मनसुबे उधळले!
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा 'अंबरनाथ पॅटर्न', निकालाआधीच भाजपचे मनसुबे उधळले!
कल्याण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता यायचा मार्ग सोपा झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये सुरूवातीचे कल समोर आल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने अडीच अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केली होती, पण आता कल्याण-डोंबिवलीचं चित्र स्पष्ट झाल्यामुळे शिवसेनेचा एकहाती सत्तेचा मार्ग मोकळा व्हायची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या आतापर्यंत 51 जागा निवडून आल्या आहेत, तर आणखी 8 जागा निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिवसेनेची 62 च्या मॅजिक फिगरच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याशिवाय शिवसेनेचे 4 अपक्ष बंडखोर निवडून आले आहेत. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आणि इतर अपक्ष शिवसेनेच्या संपर्कात आहे.

महापौरपदाचं स्वप्न भंगलं

दुसरीकडे भाजपला 41 जागांवर विजय मिळाला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढली. युती धर्म पाळून शिवसेनेने भाजपला अडीच वर्ष महापौरपद द्यावं, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली होती. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीमध्ये फक्त शिवसेनेलाचा महापौरपद मिळालं आहे आणि आताचे आकडे पाहूनही भाजपचं महापौरपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगण्याची शक्यता आहे.
advertisement

कल्याण-डोंबिवलीमध्ये अंबरनाथ पॅटर्न

कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदानाच्या आधीच भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 7 असे 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यानंतर कल्याणमध्येही सत्तेसाठी अंबरनाथ पॅटर्न राबवला जाणार का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना पक्षात घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या.
अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 27, भाजपचे 14, अजित पवारांचे 4 आणि काँग्रेसचे 12 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले. तर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली. यानंतर भाजपने काँग्रेसचे 12 नगरसेवक पक्षात घेऊन संख्याबळ वाढवत शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना गळाला लावलं आणि भाजपला धक्का दिला.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shivsena BJP : कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा 'अंबरनाथ पॅटर्न', निकालाआधीच भाजपचे मनसुबे उधळले!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement