चंद्रघंटा देवीचे स्वरूप आणि महत्त्व
चंद्राच्या आकाराच्या घंटांनी सजलेले दागिने परिधान केलेल्या देवीला चंद्रघंटा म्हणतात. चंद्र मानवी मनाचे प्रतीक आहे, तर घंटेचा नाद मनाला सजग करतो. देवीच्या नामस्मरणाने मन एकाग्र होते आणि सजगता, खंबीरपणा आणि आकर्षकता वाढते.
Weather Alert : महाराष्ट्रासाठी 6 दिवस धोक्याचे, अतिवृष्टी होणार; पंजाबराव डख यांनी दिला इशारा
advertisement
पूजनविधी आणि नैवेद्य
सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. व्रताचा संकल्प करून देवीचे षोडशोपचार पूजन करावे. पूजनावेळी पिवळ्या किंवा सोनेरी वस्त्रे परिधान करणे श्रेष्ठ मानले जाते. देवीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. विशेषतः खीर आणि बर्फी. मध आणि लोण्याचा नैवेद्यही अर्पण करावा. मोगरा, जाई किंवा जुईच्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. चंद्रघंटा देवीच्या भक्तिभावाने पूजनाने मानसिक शक्ती, संयम आणि धैर्य लाभते, असे गुरुजींनी सांगितले.