संगीतावर अफाट प्रेम असलेल्या खरटमल कुटुंबाने 1930 साली ह्या प्रवासाची सुरुवात केली. 1930 साली सटवाजी लक्ष्मण खरटमल यांनी सुरुवातीला पहिला एक ग्रामोफोन विकत घेतला आणि तिथूनच त्यांच्या ह्या संग्रहाला सुरेल सुरुवात मिळाली. पूर्वीच्या काळी रेकॉर्ड प्लेट्स, ग्रामोफोन आणि पारंपरिक स्पीकर हे तुरळक घरांमध्ये पाहायला मिळायचे.
advertisement
मूळचे सोलापूरचे असलेले खरटमल कुटुंब 2000 साली पुण्यात स्थायिक झाले. पुढे स्वप्नील खरात यांनी आपल्या पूर्वजांचा आणि वडिलांच्या वारशाला आधुनिक रूप देण्याचे ठरवले. जुन्या रेकॉर्ड आणि प्लेयर्सची निगा राखत स्वप्नील खरटमल यांनी संग्रह अधिकच विस्तारित केला. आज खरटमल कुटुंबाकडे 80 पूर्ण कार्यरत रेकॉर्ड प्लेयर्स, 2000 पेक्षा अधिक रेकॉर्ड आणि असंख्य कॅसेट्स, सीडीज, इपीज आणि एमपी थ्रीज यांचा अफाट संग्रह आहे.
नामदेव खरटमल यांनी सांगितले की, 2000 सालापासून आम्ही हा संग्रह केला आहे. जेव्हा आम्ही हा संग्रह करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आमच्याकडे 4 रेकॉर्ड होत्या, मात्र पुढे कालांतराने आम्ही संग्रह वाढवत गेलो आणि आज आमच्याकडे तब्बल 8000 हजार रेकॉर्डचा खजिना आहे. 1905 सालापासूनच्या रेकॉर्ड्स आम्ही जतन करून ठेवल्या आहेत. आज देशभरातून अनेक लोक आमचा संग्रह पाहण्यासाठी येतात. अनेक लोक त्यांच्या रेकॉर्ड्स आणि प्लेयर्स आम्हाला भेट म्हणून आणून देतात. जुन्या सुरांचा आवाज जिवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या वस्तूंचा आहे संग्रह
खरटमल यांच्याकडे 1900 च्या दशकापासूनचे जुने ग्रामोफोन आहेत. सोबतच मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील रेकॉर्ड्स आहेत. या संग्रहात एपी, ईपी आणि एसपी स्वरूपातील अनेक रेकॉर्डचा मोठा समावेश आहे. यातील अनेक रेकॉर्ड 1930 च्या दशकातील आहेत. सोबतच जुनी ध्वनी उपकरणे, स्प्लू प्लेअर, प्रोजेक्टर आणि इतर अनेक जुन्या उपकरणांचा संग्रह आहे.





