गुन्हेगारी रोखण्यासाठी सामाजिक संस्थेचा नवा प्रयोग, नागरिकांमध्ये कायद्याचं आणि सुरक्षिततेची जनजागृती करणार
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरत आहे.या पार्श्वभूमीवर आदर्श मित्र मंडळाचे सहकारी उदय जगताप यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतिनिधी पूजा सत्यवान पाटील
पुणे: गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडील आंदेकर, कोमकर आणि गणेश काळे प्रकरणांसह अनेक गंभीर घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या या शहरात वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आदर्श मित्र मंडळाचे सहकारी उदय जगताप यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
उदय जगताप यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्यासाठीच ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या पुणे कॅम्पियन अंतर्गत ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, कायदे तज्ञ आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र येऊन गुन्हेगारीविरोधात जागरूकता निर्माण करणार आहेत. कॅम्पेनद्वारे नागरिकांमध्ये कायद्याचं आणि सुरक्षिततेचं भान निर्माण करणे, हा या कॅम्पियनचा मुख्य उद्देश आहे.
advertisement
या पुणे कॅम्पियनच्या माध्यमातून गुन्हेगारीमुक्त समाज घडवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या मोहिमेद्वारे समाजात गुन्हेगारीची प्रवृत्ती कमी करणे, तरुण पिढीमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगार तयार होऊ नयेत यासाठी जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 11, 2025 7:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
गुन्हेगारी रोखण्यासाठी सामाजिक संस्थेचा नवा प्रयोग, नागरिकांमध्ये कायद्याचं आणि सुरक्षिततेची जनजागृती करणार

