पुढचे २५ महिने संघटनांना आर्थिक मदत, संवेदनशील अभिनेता सुबोध भावेचा 'बर्थडे निर्धार', पहिला चेक दिला

Last Updated:
Subodh Bhawe Birthday Special: अभिनेते सुबोध भावेंचा 50 वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाला दिग्गजांनी हजेरी लावली होती. पुढचे २५ महिने संघटनांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले
1/6
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सुबोध भावे यांचा कालच 50 वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या या वाढदिवसाला अनेक क्षेत्रातील मंडळींनी आपली उपस्थीली दर्शवली. सुबोध भावेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित फोटो शेअर केले आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सुबोध भावे यांचा कालच 50 वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या या वाढदिवसाला अनेक क्षेत्रातील मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली. सुबोध भावेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित फोटो शेअर केले आहेत.
advertisement
2/6
सुबोध भावे पोस्ट मध्ये म्हणाले,
सुबोध भावे पोस्टमध्ये म्हणाले, "काल माझा 50 वा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला 25 वर्षांचा प्रवास एकत्र साजरा केला. अर्थात माझे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व माध्यमातील माझे निर्माते, दिग्दर्शक, लेखक,  माझे सहकलाकार, पडद्यावरील व पडद्यामागील. ज्यांच्यामुळे मी घडतोय ते सर्व उपस्थित होते."
advertisement
3/6
त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ति ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ते ही उपस्थित होते. कालचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ती ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ते ही उपस्थित होते. कालचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
advertisement
4/6
माझ्यावर प्रेम करणार्‍या तुम्हा सर्वांचेही मनःपूर्वक आभार . तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण सर्वांना वैयक्तिकरीत्या त्याची पोचपावती देणे शक्य होत नाहिये.म्हणून या माध्यामातून तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे.
माझ्यावर प्रेम करणार्‍या तुम्हा सर्वांचेही मनःपूर्वक आभार . तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण सर्वांना वैयक्तिकरीत्या त्याची पोचपावती देणे शक्य होत नाही. म्हणून या माध्यामातून तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे.
advertisement
5/6
पूढे अभिनेता म्हणाला,
पुढे अभिनेता म्हणाला, "खरंतर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते. पण या वेळेस मुद्दाम करतोय. 25 वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय. समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून काम करतोय. असं ठरवलं की  पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थाना आर्थिक सहाय्य करावे. त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिनानिमित्त बीड जिल्ह्यात अनाथ मुलांसाठी काम करणार्‍या 'शांतीवन' या संस्थेच्या नागरगोजे सर यांना मा.सांस्कृतिक मंत्री आशिष जी शेलार यांच्या उपस्थितीत पहिला धनादेश दिला."
advertisement
6/6
आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील.तुम्हालाही सहाय्य करावसं वाटलं तर जरूर करा.
"आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील. तुम्हालाही सहाय्य करावसं वाटलं तर जरूर करा." अशी पोस्ट करुन सुबोध भावेनी आपला वाढदिवस साजरा केला.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement