Big Boss 19 : 'त्याला कळलं होतं की मी...' प्रणित मोरेने घराबाहेर काढताच अभिषेकचा पारा चढला, सांगितला सगळ्यांचा गेम प्लॅन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 : घराबाहेर झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बजाजने अशनूरसोबतच्या बॉन्डवर आणि प्रणित मोरेने त्याला बाहेर काढल्याच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
मुंबई : सलमान खानच्या वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १९' मधून नुकताच बाहेर पडलेला अभिनेता अभिषेक बजाज याने आपल्या एक्झिटबद्दल दुःख व्यक्त करत, घरातील सर्वात जवळचे नाते, बाहेर सुरू असलेले वाद आणि भविष्यातील योजनांवर बेधडक उत्तरे दिली आहेत. घराबाहेर झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने अशनूरसोबतच्या बॉन्डवर आणि प्रणित मोरेने त्याला बाहेर काढल्याच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
प्रणितने नात्यापेक्षा गेम निवडला!
अभिषेक बजाजच्या एक्झिटला त्याचा मित्र प्रणित मोरे जबाबदार होता. यावर बोलताना अभिषेकने प्रणितवर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "जेव्हा समजले की दोन लोक बाहेर जाणार, तेव्हा हे नक्की होते की माझ्या किंवा अशनूरमध्ये कोणीतरी जाईल. मला दुख झाले की, जी भीती होती, तेच झाले. मी पहिल्या दिवसापासून खेळात जीव ओतला होता. मी खूप रिअल होतो. माझ्याबद्दल असे कोणतेही इमोशन नव्हते, जे लोकांना माहीत नव्हते."
advertisement
तो पुढे म्हणाला, मी नेहमीच माझा स्टँड घेतला आहे, मग तो स्वतःसाठी असो किंवा मित्रांसाठी असो. पण मला धोका मिळाला. मी नाती जपली आणि प्रणित गेम खेळून गेला. त्याने त्याचा निर्णय घेतला. त्याला कळलं होतं की मी एक मजबूत खेळाडू सिद्ध होत आहे. कुठे ना कुठे लोक स्पर्धात्मक होतात. काही हरकत नाही, मी जर त्याच्या जागी असतो तर मी अशनूरला बाहेर काढले असते, कारण मी नेहमी त्याला माझी प्रायोरिटी म्हटलं आहे आणि मी जे बोलतो ते करतो,"
advertisement
Dil se sochte hai Abhishek Bajaj, kya apne fearless andaaz se kar paayenge yeh sabke dilon par raaj? 🤔
Dekhiye #BiggBoss19, Mon-Sun raat 9 baje @JioHotstar aur 10:30 baje #Colors par.#Vaseline #AppyFizz @danubeprop @vzyindia
{BB, Bigg Boss, BB19, Bigg Boss 19}… pic.twitter.com/d5z5qZIXaN
— ColorsTV (@ColorsTV) October 24, 2025
advertisement
कुनिकावर साधला निशाणा
घरातील स्पर्धकांबद्दल बोलताना अभिषेकने फरहानाचे समर्थन केले आणि कुनिका यांच्यावर टीका केली. तो म्हणाला, "फरहाना तोंडावर बोलते. ती कधीकधी चुकीचे बोलते, पण ती 'फ्रंट'वर बोलते, तुम्ही तिला बोलू शकता. पण, कुनिका जीसारखे लोक मागे खूप वाईट बोलतात, त्यांना कोणी कॉल आउट का करत नाही? फरहाना तर त्यांच्या अर्ध्या वयाची आहे, ती चुकली तर तिला शिकवता येते, पण कुनिका जी तर आजीच्या वयाच्या आहेत, त्या चुकल्या तर कोण ऐकणार?"
advertisement
शो कोण जिंकेल, या प्रश्नावर अभिषेकने सर्व स्पर्धकांवर शेरा मारला. अभिषेक म्हणाला, "मी जिंकण्यासाठी खेळत होतो, पण आता मला विजेती फक्त अशनूर दिसते."
इतरांवर टीका करत त्याने गौरव खन्नाला 'बॅकफुट', प्रणितला 'स्मार्ट अँड वीक', तान्या मित्तलला 'ड्रामा', अमलला 'बॅड माऊथ', मालतीला 'विकेट', शहबाजला 'बिलो द बेल्ट', मृदुलला 'ट्यूबलाइट', नीलमला 'नो इंडिव्हिज्युअलिटी', आणि नेहलला 'निगेटिव्ह' म्हटले आहे. अभिषेकच्या या स्पष्ट बोलण्यामुळे त्याला घराबाहेर काढल्याचे खूप वाईट वाटले आहे, हे समजते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 6:32 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Big Boss 19 : 'त्याला कळलं होतं की मी...' प्रणित मोरेने घराबाहेर काढताच अभिषेकचा पारा चढला, सांगितला सगळ्यांचा गेम प्लॅन


