तो ‘लाल किल्ला’ नाही, तर त्याचं नाव दुसरंच, शाहजहानने दिलेली होती त्याला वेगळी ओळख
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ज्या नावाने आज तो जगभर प्रसिद्ध आहे, ते नाव त्याला नंतर मिळालं. अलीकडच्या दिल्ली ब्लास्टनंतर पुन्हा एकदा हा किल्ला चर्चेत आला आहे
मुंबई : दिल्लीचं लाल किल्ला भारताच्या इतिहासातील एक असं स्मारक, जे केवळ भव्यतेसाठी नाही तर अनेक ऐतिहासिक घटनांसाठीही ओळखलं जातं. प्रत्येक भारतीयासाठी लाल किल्ला म्हणजे अभिमानाचं प्रतीक, पण तुम्हाला माहीत आहे का या प्रसिद्ध किल्ल्याचं मूळ नाव ‘लाल किल्ला’ नव्हतंच. होय, ज्या नावाने आज तो जगभर प्रसिद्ध आहे, ते नाव त्याला नंतर मिळालं. अलीकडच्या दिल्ली ब्लास्टनंतर पुन्हा एकदा हा किल्ला चर्चेत आला आहे आणि त्यामुळे त्याचं खरं नाव आणि इतिहास जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
लाल किल्ल्याची ओळख आणि इतिहास
दिल्लीतील लाल किल्ला हा मुघल स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना मानला जातो. या भव्य किल्ल्याचं बांधकाम मुघल बादशाह शाहजहानने इ.स. 1638 मध्ये सुरू केलं आणि सुमारे दहा वर्षांत म्हणजे 1648 मध्ये ते पूर्ण झालं. शाहजहानने दिल्लीतील ‘शाहजहानाबाद’ नावाची नवी राजधानी वसवली होती आणि ह्याच शहराच्या मध्यभागी हा किल्ला उभा करण्यात आला.
advertisement
लाल किल्ल्याच्या वास्तूत भारतीय, पारसी आणि इस्लामी शैलींचा सुंदर संगम दिसून येतो. त्याच्या भिंती लाल बलुआ दगडांनी बनलेल्या असल्यामुळे दूरवरूनही हा किल्ला सहज ओळखता येतो. म्हणूनच, नंतर लोकांनी त्याला “लाल किल्ला” असं म्हणायला सुरुवात केली.
लाल किल्ल्याचं खरं नाव काय होतं?
शाहजहानने जेव्हा हा किल्ला बांधला, तेव्हा त्याचं अधिकृत नाव ‘किल्ला-ए-मुबारक’ असं ठेवलं होतं. मुघल काळात त्याच नावाने हा किल्ला ओळखला जायचा. या नावाचा अर्थ “पवित्र किल्ला” किंवा “शुभ किल्ला” असा होतो. मात्र, काळानुसार आणि विशेषतः ब्रिटिश काळात, इंग्रजांनी लाल बलुआ दगडांच्या रंगामुळे त्याला “Red Fort” म्हणजेच “लाल किल्ला” म्हणायला सुरुवात केली, आणि ते नाव इतकं लोकप्रिय झालं की मूळ नावाचा लोकांना विसर पडलाय
advertisement
मुघल काळात लाल किल्ल्याच्या आत एक खास बाजार भरायचा मीना बाजार. पण हा बाजार सर्वांसाठी खुला नव्हता. येथे फक्त शाही स्त्रिया, राजकन्या आणि हरममधील महिला खरेदीसाठी येत असत. आज मात्र हा बाजार सर्वांसाठी खुला आहे. पर्यटक येथे तिकिट घेऊन आत जाऊ शकतात आणि जुन्या काळाच्या वातावरणात खरेदीचा आनंद घेऊ शकतात.
advertisement
आज लाल किल्ला केवळ ऐतिहासिक स्मारक नाही, तर देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक बनलेलं आहे. पण त्याच्या नावामागचं हे रोचक सत्य की त्याचं मूळ नाव किल्ला-ए-मुबारक होतं हे जाणून घेणंही तितकंच मनोरंजक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 6:18 PM IST
मराठी बातम्या/Viral/
तो ‘लाल किल्ला’ नाही, तर त्याचं नाव दुसरंच, शाहजहानने दिलेली होती त्याला वेगळी ओळख


