कोथरुड प्रकरण: मुलींना मारहाण करणं पोलिसांना भोवलं; कोर्टाचे कडक निर्देश, केस करणाऱ्यांवर केस
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
Pune News: पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली असून, नागरिकांमध्येही तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
पुणे : पुण्यातील कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण पुणे पोलिसांना भोवलं असून या प्रकरणात संबंधित महिला पोलिसांवरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कोथरुडमध्ये पोलिसांनी दोन मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या घटनेमुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर प्राथमिक तपासात संबंधित महिला पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली असून, नागरिकांमध्येही तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. कारवाईच्या मागणीसाठी या पीडित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी त्या मुलींच्या उपस्थितीत पोलिसींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.
advertisement
मुलींनी काय आरोप केला होता?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला होता.
advertisement
कोर्टाने काय आदेश दिले?
कोथरूड पोलिस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे,पोलिस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलिस विभागाचे धनंजय सानप, छत्रपती संभाजीनगरचे माजी पोलिस अधिकारी सखाराम सानप यांच्यावर आता गुन्हा दाखल करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी तपास करावा असा आदेश सुद्धा कोर्टाने दिले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 11, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
कोथरुड प्रकरण: मुलींना मारहाण करणं पोलिसांना भोवलं; कोर्टाचे कडक निर्देश, केस करणाऱ्यांवर केस


