Winter Care : घरी बनवा रसायनविरहित लिप बाम, बनवायला एकदम सोपी कृती, नक्की वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
थंड वारे त्वचेतील ओलावा कमी करतात, ज्यामुळे कोरडेपणा येतो. कोरडेपणामुळे ओठ काळे होऊ शकतात. लिपस्टिकचा जास्त वापर किंवा धूम्रपान केल्यानंही ओठ काळे होतात आणि फाटू शकतात. यासाठी एक घरगुती लिप बाम बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. YouTuber पूनम देवनानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : हिवाळा सुरू झालाय, हवा थंड व्हायला सुरुवात झाली त्यामुळे हाता पायाला खाज येणं, ओठ फुटणं असे प्रकार सुरु होतात. जास्त थंड हवेमुळे ओठ फाटतात. काही वेळा काळे आणि कोरडे दिसतात.
थंड वारे त्वचेतील ओलावा कमी करतात, ज्यामुळे कोरडेपणा येतो. कोरडेपणामुळे ओठ काळे होऊ शकतात. लिपस्टिकचा जास्त वापर किंवा धूम्रपान केल्यानंही ओठ काळे होतात आणि फाटू शकतात. यासाठी एक घरगुती लिप बाम बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. YouTuber पूनम देवनानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
होममेड लिप बामसाठी साहित्य - बीट, गुलाबाच्या पाकळ्या, नारळाचं तेल, बदाम तेल, कोरफड गर आणि पेट्रोलियम जेली आणि गुलाबपाणी
लिप बाम कसा बनवायचा पाहूया - हा लिप बाम बनवायला खूप सोपा आहे. प्रथम, बीट किसून घ्या.
मिश्रणात गुलाबपाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि मिक्सरमधे बारीक करा. मिश्रण कापडातून गाळून घ्या.
advertisement
यामधे नारळ तेल आणि बदाम तेल चांगलं मिसळा. नंतर, मिश्रणात कोरफड गर आणि पेट्रोलियम जेली घाला.
एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात या मिश्रणाची वाटी ठेवा. अगदी काही मिनिटांत तुमचा लिप बाम तयार आहे. काचेच्या डब्यात किंवा बाटलीत काढून ठेवू शकता.
advertisement
हा नैसर्गिक लिप बाम रोज वापरु शकता. त्यात कोणतंही रसायन नसल्यानं बाम ओठांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. बाम दररोज लावल्यानं ओठ लवकर गुलाबी आणि मऊ होतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 8:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : घरी बनवा रसायनविरहित लिप बाम, बनवायला एकदम सोपी कृती, नक्की वाचा