Bloating : पोटफुगीवर नैसर्गिक उत्तर, घरगुती हेल्थ ड्रिंकचा वापर ठरेल परिणामकारक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पोटफुगीची समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर एक सोपी आणि प्रभावी पद्धत यासाठी उपयुक्त ठरु शकते. यामुळे तुम्हाला खाल्ल्यानंतर जड वाटणार नाही. पोषणतज्ज्ञ नेहा सहाय यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती दिली आहे.
मुंबई : अनेक जण जेवल्यानंतर पोट फुगल्याची तक्रार करतात. याला ब्लोटिंग म्हणतात. अनेकदा, तीव्र पोटफुगीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो.
पोटफुगीची समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर एक सोपी आणि प्रभावी पद्धत यासाठी उपयुक्त ठरु शकते. यामुळे तुम्हाला खाल्ल्यानंतर जड वाटणार नाही. पोषणतज्ज्ञ नेहा सहाय यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती दिली आहे.
खूप जेवल्यानंतर किंवा खूप घाईघाईत जेवल्यामुळे ही समस्या जाणवते. या समस्येवर उपाय म्हणून एक पेय बनवू शकता. यासाठी, पाण्यात अर्धा चमचा बडीशेप, एक तुकडा ताजं आलं, पुदिन्याची 4-5 पानं आणि अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास कोमट पाण्यात मिसळा. यावर पाच मिनिट झाकण ठेवा. नंतर ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर हळूहळू प्या. पाणी जास्त गरम होऊ नये याची काळजी घ्या.
advertisement
यात वापरलेल्या घटकांचे फायदे -
बडीशेप - बडीशेपेमधले घटक पोटाच्या स्नायूंना आराम देतात. यामुळे वायू बाहेर पडणं सोपं होतं आणि पोटातील जडपणा कमी होतो.
आलं - आल्यामुळे पचनक्रिया जलद होते आणि वायू तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे पोटातील जळजळ आणि पेटके यापासून देखील आराम देते.
advertisement
पुदिना - पुदिन्यात थंडावा देणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे पोट शांत राहतं आणि अपचनापासून आराम मिळतो.
लिंबू - लिंबामुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे पोट फुगणं आणि पाणी टिकून राहणं कमी होतं. हे पेय जेवणानंतर पंधरा-वीस मिनिटांनी पिऊ शकता. यामुळे नैसर्गिकरित्या पोटाला आराम मिळतो आणि गॅस लवकर काढून टाकण्यास मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 7:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bloating : पोटफुगीवर नैसर्गिक उत्तर, घरगुती हेल्थ ड्रिंकचा वापर ठरेल परिणामकारक