Bihar Exit Poll: महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही MIM ला मोठा धक्का, ओवैसींचं 'मुस्लिम कार्ड' फेल? तिसरी आघाडी भोवली

Last Updated:

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये असादुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने तब्बल

News18
News18
बिहारचा बाहुबली कोण होणार? आता याची चर्चा सुरू झाली आहेय  बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे.  उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. आता बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याची चर्चा रंगली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच असाउद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनेही बिहारच्या निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. पण, यंदा ओवेसींच्या हातात 'भोपळा' लागण्याची चिन्ह आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये असादुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने तब्बल 35 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे.  डीव्ही रिसर्च नावाच्या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असा अंदाज वर्तवला आहे. एनडीएला  137 ते 152 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर महागठबंधनला 83 ते 98 जागा मिळतील., तर जनसुराज पक्षाला 2 ते 4 आमि ओवैसी यांच्या पक्षाला  0 ते 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
विशेष म्हणजे,  बिहार विधानसभा निवडणुकीत ओवैसींनी ३५ जागा लढल्या आहे. या निवडणुकीत AIMIM ने आझाद समाज पार्टी आणि अपनी जनता पार्टी यांच्यासोबत 'तिसरी आघाडी  स्थापन केली होती. या आघाडीमध्ये एकूण ६४ जागा लढवण्याचं ठरलं होतं. यामध्ये  एमआयएमने 35 जागांची मागणी केली आणि निवडणूक लढवली. पण आता एमआयएमच्या हातात फक्त ० किंवा २ जागा मिळतील असा अंदाज आहे.
advertisement
मागील निवडणुकीत AIMIM  ने जिंकल्या होत्या ५ जागा!
विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत अर्थात 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  AIMIM ने उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वाखालील 'ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट'चा भाग म्हणून 20 जागांवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत AIMIM ने ५ जागा जिंकून आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं. या पाचही जागा सीमांचल प्रदेशात होत्या. त्यामुळे AIMIM ने विधानसभा २०२५ च्या  निवडणुकीत AIMIM ने सीमांचल तसंच बिहारच्या इतर भागांमध्ये ताकद लावली. पण, आता AIMIM ची बिहारमधून एक्झिट होताना दिसत आहे. त्यामुळे १४ नोव्हेंबरला मतमोजणीमध्ये काय होईल, हे पाहण्याचं ठरणार आहे.
advertisement
महाराष्ट्र विधानसभेत निसटता विजय
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही AIMIM ला मोठा धक्का बसला होता. २०१९ च्या निवडणुकीत AIMIM चे २ आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत AIMIM ला मालेगावमध्ये एकच जागा जिंकता आली ती सुद्धा फक्त १६२ मतांची जिंकली होती. या निवडणुकीत AIMIM ने १६ जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये आता निवडणूक होत आाहे, आता इथंही ओवैसींची मुस्लिम कार्ड फेल गेलं आहे,
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bihar Exit Poll: महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही MIM ला मोठा धक्का, ओवैसींचं 'मुस्लिम कार्ड' फेल? तिसरी आघाडी भोवली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement