Krushi Market Today Rate: सोयाबीन उत्पादकांना उत्तम बाजारभाव, कांद्यासह इतर शेतमालांची स्थिती काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मुंबई: मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 36 हजार 422 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 5 हजार 778 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1075 ते जास्तीत जास्त 1560 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2650 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये आज 1 लाख, 76 हजार 035 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 95 हजार 310 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 365 ते जास्तीत जास्त 1976 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 400 क्विंटल कांद्यास 1700 ते 3000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक आणि भाव दबावात: राज्याच्या मार्केटमध्ये 89 हजार 078 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 20 हजार 300 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4186 ते 4505 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 8696 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 3900 ते 5528 प्रमाणे सर्वाधिक हमी भावाहून अधिक भाव मिळाला.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 11, 2025 8:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Today Rate: सोयाबीन उत्पादकांना उत्तम बाजारभाव, कांद्यासह इतर शेतमालांची स्थिती काय?

