advertisement

Panvel : वय अवघं 20 ते 25 वर्षे, पण विद्यार्थ्यांकडून धक्कादायक प्रकार, पोलिसही हैराण; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Panvel crime news : नवी मुंबईतील समोर आलेल्या घटनेने सध्या सर्वत्र चिंता निर्माण केली असून नेमकी ही समस्या किती सुटेल असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

narcotics seized from youth by police
narcotics seized from youth by police
पनवेल : सध्या काही तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. अशातच पनवेलमधून समोर आलेले एक प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. अवघ्या 20 ते 25 वर्षांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या कृत्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
दोन तरुण विद्यार्थ्यांमुळे पोलिसांची धावपळ
गेल्या काही दिवसांपूर्वी तळोजाच्या एका भागातून हेरॉइनचा मोठा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच कळंबोलीतही अशीच एक घटना घडली आहे. या प्रकरणात धक्कादायक वास्तव्य म्हणजे या प्रकरण दोन विद्यार्थ्यांकडून तब्बल सव्वाचार लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठी जप्त करण्यात आला आहे. सध्या या दोन्ही विद्यार्थ्यांना अटक केली असून गुन्हा देखील नोंदवला आहे.
advertisement
पंजाबमधील टोळीचा विद्यार्थ्यांशी संबंध
साधारण दोन आठवड्यांपूर्वी तळोजाच्या घोटकॅप्म येथे असलेल्या एका इमारतीमधून तब्बल 1 कोटी रुपयांचे हेरॉइन आणि काही पदार्थ जप्त केले होते. ज्यात कारवाईनंतर याच कारवाईचा पुढचा भाग म्हणून पंजाब राज्यातून तस्करी करणाऱ्या टोळीने कळंबोली तसेच तळोजा येथील या दोन विद्यार्थ्यांना या तस्करीत ओढले.
दोन विद्यार्थ्यांचा भूतकाळही भयानक
अटक करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांचे वय 20 आणि दुसऱ्याचे 25 वर्षे असे आहे. याच विद्यार्थ्यांना कळंबोली पोलिसांनी सोमवारी मुंब्रा पनवेल महामार्गावर कळंबोली गावासमोरील एका उड्डाणपुलाखाली 4 लाख 37 हजार 500 रुपयाच्या अमली पदार्थासह पकडण्यात आले होती. सर्व कारवाई ही वरिष्ट पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या नेतृत्वाखी करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel : वय अवघं 20 ते 25 वर्षे, पण विद्यार्थ्यांकडून धक्कादायक प्रकार, पोलिसही हैराण; नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement