advertisement

Beed: कामात मदत का करत नाही? आईवडील रागावले, 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं

Last Updated:

Beed News: घरातील या किरकोळ कारणाचा त्याने मनावर मोठा परिणाम करून घेतला आणि भावनेच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Beed: कामात मदत का करत नाही? आईवडील रागावले, 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं
Beed: कामात मदत का करत नाही? आईवडील रागावले, 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं
बीड: सध्याच्या काळात क्षुल्लक कारणावरून तरुणाई टोकाचे निर्णय घेतल्याचे प्रकार वाढले आहेत. बीडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे एक आई-वडील रागावले म्हणून 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विराज हरिदास भगत असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराज घरातील कामात अपेक्षेप्रमाणे मदत करत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला समज देत रागावले होते. या कारणामुळे तो काहीसा नाराज झाला होता. घरातील या किरकोळ कारणाचा त्याने मनावर मोठा परिणाम करून घेतला आणि भावनेच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
advertisement
मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विराज घरातून निघून गावाजवळील ‘काळशेत’ शिवारातील त्यांच्या शेताकडे गेला. तेथे सर्वे क्रमांक 119 मधील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. काही वेळानंतर त्याची बहीण शेतात गेली असता हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. भावाला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली आणि तिने तत्काळ कुटुंबीयांना याची माहिती दिली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ विराजला खाली उतरवून उपचारासाठी कडा येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे भगत कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. खेळत्या-बागडत्या वयातील तरुणाने भावनेच्या भरात जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, लहान-मोठ्या कारणांमुळे युवकांनी टोकाचे निर्णय घेऊ नयेत, तसेच पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद ठेवून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed: कामात मदत का करत नाही? आईवडील रागावले, 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement