Marriage : तुमचं लग्न ठरायला येत आहेत अडथळे? मग करा हे उपाय, मिळेल नक्कीच लाभ, Video

Last Updated:

तुळशी विवाहानंतर आता सर्वत्र लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू झाले आहेत. या वर्षी अनेक विवाह संपन्न होणार असले तरी, काही व्यक्तींच्या लग्नात विविध कारणांमुळे अडथळे येत असतात.

+
News18

News18

नाशिक : तुळशी विवाहानंतर आता सर्वत्र लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू झाले आहेत. या वर्षी अनेक विवाह संपन्न होणार असले तरी, काही व्यक्तींच्या लग्नात विविध कारणांमुळे अडथळे येत असतात. नाशिक येथील अंकशास्त्र तज्ज्ञ विभा घावरे यांनी अशा व्यक्तींसाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे लग्नाचे योग लवकर जुळून येण्यास मदत होईल.
अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी उपाय:
बऱ्याच काळापासून लग्नाचा योग येत नाही म्हणून चिंतेत असलेल्यांसाठी खालील उपाय करणे निश्चितच फायद्याचे ठरू शकते:
1. हळदीचा वापर
स्नान: रोजच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करावे. रोज करणे उत्तम, शक्य नसल्यास गुरुवारी नक्की करावे.
advertisement
हळदीची गाठ: आपल्या जवळ नेहमी हळदीची गाठ (हळद कुंड) ठेवावी. खिशात ठेवणे शक्य नसल्यास, ती आपल्या दैनंदिन वापरातील पर्स, पाकीट किंवा दप्तरात ठेवली तरी चालेल. ही गाठ नेहमी सोबत असावी.
2. क्रिस्टल्सचा आधार
लग्नातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही विशिष्ट क्रिस्टल्स (Stones) देखील फायदेशीर ठरतात. हे क्रिस्टल्स ब्रेसलेट किंवा लहान पोटलीच्या स्वरूपात सोबत ठेवल्यास लवकर जीवनसाथी मिळण्यास मदत होते.
advertisement
क्रिस्टलचे नाव उपयोग आणि फायदे
रोझ क्वार्ट्झ (Rose Quartz)
हे तुमचे नातेसंबंध घट्ट करते. तसेच, तुमचे विचार आणि भावना एकमेकांशी जोडण्यासाठी मदत करते.
मूनस्टोन (Moonstone)
हे तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण करते आणि तुमच्या भावना एकत्रित आणते.
रोडानाइट (Rhodonite)
हे क्रिस्टल तुमच्या वर्तमानावर प्रभाव टाकून भविष्यात बदल घडवते. नवीन प्रेमसंबंध जोडण्यासाठी मदत करते आणि शरीरातील चक्रांना (Chakras) सक्रिय करते.
advertisement
ग्रीन ॲव्हेंच्युरिन (Green Aventurine)
हे तुमच्या नशिबाला यश मिळवून देण्यासाठी मदत करते आणि नवीन संबंधांना जीवनात आकर्षित करते.
क्लियर क्वार्ट्झ (Clear Quartz)
हे क्रिस्टल इतर सर्व क्रिस्टल्सची ऊर्जा एकत्रित करून तिला अधिक प्रभावी बनवते.
धारण करण्याची पद्धत: हे सर्व क्रिस्टल्स तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात हातामध्ये ब्रेसलेटच्या स्वरूपात धारण करू शकता. यामुळे तुमच्या रखडलेल्या लग्नाच्या इच्छेला नक्कीच नवीन दिशा मिळू शकते.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Marriage : तुमचं लग्न ठरायला येत आहेत अडथळे? मग करा हे उपाय, मिळेल नक्कीच लाभ, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement