बोर्डाच्या एका चुकीने करिअर बरबाद, वर्ल्ड नंबर वन बॉलरचे ग्रह फिरले, पोटासाठी आता करतो नोकरी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
कधीकाळी जागतिक क्रमवारीमध्ये नंबर वन राहिलेल्या फास्ट बॉलरचं करिअर बोर्डाच्या एका चुकीने उद्ध्वस्त झालं. आता हा फास्ट बॉलर पोट भरण्यासाठी नोकरी करत आहे.
मुंबई : क्रिकेटला कायमच अनिश्चिततेचा खेळ मानलं जातं, कधी एखादा खेळाडू एका रात्रीमध्ये स्टार होतो, तर कधी दिग्गज खेळाडूची कारकिर्द अकाली उद्ध्वस्त होऊ शकते, असंच काहीसं घडलं ऑस्ट्रेलियाच्या माजी फास्ट बॉलरसोबत. बॉलिंगचा वेग आणि अचूक लाईन आणि लेंथने बॉलरसाठी डोकेदुखी ठरलेला हा खेळाडू आता स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी नोकरी करत आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि डॉक्टरांच्या अयोग्य उपचारांमुळे त्याची कारकीर्द अकाली संपली, ज्यामुळे त्याला स्वतःला आधार देण्यासाठी कॉर्पोरेट नोकरी स्वीकारावी लागली.
नॅथन ब्रॅकनने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासाठी पाच टेस्ट, 116 वनडे आणि 19 टी-20 सामने खेळले. ब्रॅकनने टेस्ट क्रिकेटमध्ये 12, वनडे सामन्यांमध्ये 174 आणि टी-20 मध्ये 19 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियासाठी इतकी उत्तम कारकीर्द असूनही, त्याने वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली.
नॅथन ब्रॅकनने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. ब्रॅकनच्या निवृत्तीचे कारण उजव्या गुडघ्याला झालेली दुखापत होती. ब्रॅकन 2009 पासून या दुखापतीशी झुंजत होता. दुखापतीमुळे ब्रॅकनला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. शस्त्रक्रियेनंतर, ब्रॅकनने ऑस्ट्रेलियासाठी पुन्हा खेळण्यासाठी त्याची बॉलिंग ऍक्शन बदलली, पण शेवटी, डॉक्टरांनी त्याला मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला, यामुळे नॅथन ब्रॅकन निराश झाला. त्याला माहित होते की त्याच्यात क्रिकेट शिल्लक आहे, पण दुखापतीने त्याला मैदान सोडावे लागले.
advertisement
बोर्डाच्या चुकीने करिअर बरबाद
नॅथन ब्रॅकनमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली. बोर्ड आणि ब्रॅकन यांच्यात वाद निर्माण झाला. नॅथन ब्रॅकनने निष्काळजीपणाचा आरोप करत क्रिकेट बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आणि सुमारे 1 मिलियन डॉलर भरपाईची मागणी केली. ब्रॅकनने दावा केला की 2007 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती, पण बोर्डाचे डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट त्याचे योग्य निदान करण्यात अयशस्वी झाले. शस्त्रक्रियेची आवश्यकता असतानाही मेडिकल टीमने त्याला खेळण्यासाठी फिट घोषित केले. आपल्याला त्यावेळी योग्य उपचार मिळाले असते तर मी 2015 चा ऑस्ट्रेलियात झालेला क्रिकेट वर्ल्ड कप खेळू शकलो असतो, असं नॅथन ब्रॅकनला वाटतं.
advertisement
ब्रॅकनचं कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम
ब्रॅकनचा क्रिकेट बोर्डाशी बराच काळ वाद होता. पण, नंतर क्रिकेट बोर्ड आणि ब्रॅकन यांच्यात परस्पर समझोता झाला. तेव्हापासून, ब्रॅकन स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सिडनीमधील एका कॉर्पोरेट कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून काम करत आहे. एकेकाळी जगातील नंबर वन फास्ट बॉलर असलेला ब्रॅकन पूर्णपणे बदलला आहे. तो त्याच्या नोकरीत आनंदी आहे आणि त्याच्या कुटुंबासह आनंदी जीवन जगतो आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बोर्डाच्या एका चुकीने करिअर बरबाद, वर्ल्ड नंबर वन बॉलरचे ग्रह फिरले, पोटासाठी आता करतो नोकरी!











