Mahindra चा धमाका, 456 किमी रेंजची आणली धाकड SUV, किंमतही कमी

Last Updated:

भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आता  Mahindra XUV 3XO चं EV व्हेरियंट लाँच केली आहे.

News18
News18
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यापासून कारच्या किंमतीत एसयूव्ही उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचा एसयूव्ही खरेदीकडे कल वाढला आहे. भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आता  Mahindra XUV 3XO चं EV व्हेरियंट लाँच केली आहे. Mahindra XUV 3XO ही आधीच पेट्रोल व्हेरियंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता Mahindra XUV 3XO चं ईव्ही मॉडेल लाँच करत असतून किंमत १३.८९ लाखांपासून सुरू होणार आहे.
Mahindra XUV 3XO मध्ये इतक मॉडेलप्रमाणे दमदार बॅटरी बॅक दिला आहे. यामध्ये ३९.४ kWh ची बॅटरी असणार आहे.  ही SUV सिंगल चार्जमध्ये २८५ किमीची 'रियल-वर्ल्ड' रेंज (AC ऑन सह) देईल असा दावा कंपनीने केला आहे.  तर MIDC अंतर्गत याची रेंज 456 किमी इतकी असेल.  पर्यंत जाऊ शकते. Mahindra XUV 3XO मधील मोटर  १५० PS ची पॉवर आणि ३१० Nm चा टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे ही कार अवघ्या ८.३ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग गाठू शकते.
advertisement
Mahindra XUV 3XO मध्ये फिचर्सही चांगले दिले आहे. फर्स्ट पॅनोरमिक 'स्काय-रूफ' या इलेक्ट्रिक SUV चे सर्वात मोठं फिचर्स दिलं आहे.  इंटीरियर खूप प्रीमियम ठेवण्यात आलं असून त्यात सॉफ्ट-टच प्लास्टिक आणि लेदरेट सीटचा वापर केला आहे. केबिनमध्ये १०.२५-इंचच्या दोन स्क्रीन दिल्या आहेत.
Mahindra XUV 3XO मध्ये हाय-टेक साउंड सिस्टम आणि कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ७-स्पीकर असलेली Harman Kardon साउंड सिस्टम दिली आहे, जी Dolby Atmos ला सपोर्ट करते. कारमध्ये Adrenox कनेक्टेड टेक्नोलॉजीद्वारे ८० पेक्षा जास्त फीचर्स आणि बिल्ट-इन Alexa ची सुविधा मिळते. याशिवाय, यात डुअल-जोन क्लाइमेट कंट्रोल, ६५W चा USB-C फास्ट चार्जिंग पोर्ट आणि वायरलेस एंड्रॉइड ऑटो/एप्पल कारप्ले सारखे आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.
advertisement
Mahindra XUV 3XO मध्ये लेव्हल-२ ADAS दिलं आहे.  XUV3XO EV च्या टॉप वेरिएंटमध्ये लेव्ह-२ ADAS (एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम) दिले आहे. तसंच वेरिएंट्समध्ये ६ एअरबॅग, ESP (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम), आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखे स्टँडर्ड फिचर्स दिले आहे. एवढंच नाहीतर टॉप मॉडेलमध्ये ३६०-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग फिचरही आहे.
advertisement
Mahindra XUV 3XO च्या बेस वेरिएंट AX5 ची किंमत १३.८९ लाख रुपये इतकी आहे, तर टॉप-एंड वेरिएंट AX7L ची किंमत १४.९६ लाख रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे. Mahindra XUV 3XO या नवीन EV ची डिलिव्हरी २३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. कंपनीने या कारच्या बॅटरी आणि मोटरवर ८ वर्षे किंवा १.६ लाख किमीची लांब वारंटी जाहीर केली आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Mahindra चा धमाका, 456 किमी रेंजची आणली धाकड SUV, किंमतही कमी
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement