Gmail तुमच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवतेय? लगेच बंद करा या 2 सेटिंग्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gmail: जीमेल यूझर्सच्या प्रायव्हसीविषयी वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या दाव्यानुसार गुगलने आपल्या AI सिस्टमला चांगले बनवण्यासाठी यूझर्सच्या ईमेल डेटापर्यंत पोहोचू शकतो.
Gmail: सध्याच्या काळात जीमेलचा सर्वच लोक वापर करतात. ऑफिसच्या कामांसाठी हे खुप उपयुक्त असते. मात्र आता यूझच्या प्रायव्हसीविषयी वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या दाव्यांनुसार, गुगलने आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सिस्टमला चांगलं बनवण्यासाठी यूझर्सच्या ईमेल डेटापर्यंत पोहोचू शकते.
advertisement
advertisement
जीमेलबद्दल नवीन गोंधळ का? : इंजीनियरिंग युट्यूबर आणि टेक तज्ञ डेव्हरी जोन्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दावा केला आहे की अनेक जीमेल यूझर्सने आधीच नकळत एआय ट्रेनिंगसाठी संमती दिली आहे. त्यांच्या मते, काही जीमेल सेटिंग्ज एआय मॉडेल्ससह ईमेल कंटेंटला शेअर करण्याची परवानगी देतात. त्यांनी हे एक गंभीर प्रयाव्हसी धोका असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की जर यूझर्सने हे पर्याय मॅन्युअली अक्षम केले नाहीत तर डेटा अॅक्सेस सुरू राहू शकतो.
advertisement
कोणती स्मार्ट फीचर्स टेन्शन वाढवत आहेत? : रिपोर्ट्स सांगतात की, जीमेलची स्मार्ट फीचर्स आणि वर्कस्पेस स्मार्ट फीचर्स या संपूर्ण समस्येचे मूळ आहेत. ही फीचर्स Ask Gemini, ईमेल समरी, स्मार्ट रिप्लाय आणि गुगल असिस्टंट सारखी टूल्स सक्षम करतात. टेक एक्सपर्ट्सचा असा विश्वास आहे की ही सर्व एआय फीचर्स थेट यूझर्सच्या इनबॉक्स डेटावर अवलंबून असतात. जोपर्यंत ही फीचर्स सक्षम आहेत, तोपर्यंत AI ईमेल डेटापासून पूर्णपणे वेगळे करता येणार नाही.
advertisement
Gmail मध्ये AI अॅक्सेस कसे थांबवले जाते : यूझर जीमेलमध्ये AI च्या हस्तक्षेप कमी करु इच्छित असेल तर तुमच्या सेटिंगमध्ये बदल करणे गरजेचे आहे. डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर जीमेल उगडल्यानंतर “See all settings” मध्ये जाऊन Smart Features शी जोडलेला पर्याय बंद करावा लागतो. यानंतर Workspace Smart Features च्या वेगळ्या सेटिंग्समध्ये जाऊन गुगलच्या इतर प्रोडक्ट्सशी संबंधित स्मार्ट ऑप्शन्सही डिसेबल करणे गरजेचे मानले जात आहे. या दोन्हीही ठिकाणी बदल केल्याशिवाय AI शी सबंधित अॅक्सेस पूर्णपणे संपत नाही.
advertisement
आरोपांवर गुगलचे स्पष्टीकरण: गुगलने हे क्लेम फेटाळून लावले आहेत. असे म्हटले आहे की जीमेल यूझर्सचा ईमेल डेटा AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जात नाही. कंपनीच्या मते, डेटा केवळ फीचर्सच्या योग्य ऑपरेशन आणि प्रोसेससाठी वापरला जातो. तसंच, अनेक सायबरसुरक्षा तज्ञांचा असा विश्वास आहे की जेमिनी सारखी एआय फीचर्स यूझर्सच्या डेटावर जास्त अवलंबून असतात. शिवाय, जीमेलच्या सेटिंग्ज इतक्या गुंतागुंतीच्या आहेत की सरासरी यूझर्सला हे समजत नाही की कोणते ऑप्शन त्यांच्या प्रायव्हसीवर परिणाम करत आहेत.
advertisement
प्रायव्हसी का महत्त्वाची आहे: डिजिटल युगात, ईमेल आता फक्त मेसेज पाठवण्याचे साधन राहिलेले नाही; त्यात बँकिंग, ऑफिस आणि पर्सनल माहिती देखील असते. म्हणून, एखाद्या यूझरने त्यांच्या सेटिंग्जकडे दुर्लक्ष केले तर त्यांची प्रायव्हसी अनवधानाने धोक्यात येऊ शकते. म्हणून, वेळोवेळी जीमेल सेटिंग्ज तपासणे आणि अनावश्यक स्मार्ट फीचर्स अक्षम करणे चांगले.











