रिलस्टार गणेश डोंगरेंच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आंदोलनाची वेळ, अश्विनी ढसाढसा रडली, अजितदादांचा कारखाना पाडला बंद

Last Updated:

यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी उमरगा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडला

News18
News18
धाराशिव : बीडमध्ये काही दिवसांपूर्वी ऊसतोड मजूर आणि रिलस्टार गणेश डोंगरे यांचा ऊस कारखान्यात ट्रॉलीखाली दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंगरे कुटुंबीयांना मदत मिळावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यावर ऊसतोड कामगारांनी तीव्र आंदोलन केलं.  डोंगरे यांच्या नातेवाईक आणि आंदोलकांनी कारखानाच बंद पाडला.
रील स्टार आणि ऊसतोड मजूर असलेल्या गणेश डोंगरे  याचा ३ जानेवारी २०२५ रोजी उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर ऊस ट्रॉलीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गणेश डोंगरेच्या मृत्यू नंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. घटनेला ६ दिवस उलटले तरी कारखाना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एवढंच नाहीतर डोंगरे कुटुंबीयांना मदतही दिली नाही.
advertisement
त्यामुळे डोंगरे कुटुंबीय आणि स्थानिकांनी कारखान्यासमोर जोरदार आंदोलन केलं.  मयत गणेश डोंगरे याच्या पश्चात ३ लहान मुलं आहे. त्याच्याा कुटुंबीय आणि मुलांना दहा लाखाची मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. पण, कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे  कारखान्यावर अपघातामध्ये मृत झालेल्या गणेश डोंगरेच्या कुटुंबाला मदत न केल्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून महिला मुला बाळांसह आंदोलन केलं.
advertisement
यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी उमरगा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडला. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. कारखान्यात  मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे  पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
गणेश डोंगरेचा मृत्यू कसा झाला? 
3 जानेवारी 2026 रोजी गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ऊस सोडण्यासाठी गेले होते. साखर कारखान्यात वजन काट्याजवळ ऊस मोजण्यासाठी बरीच गर्दी होती. त्यामुळे आपला नंबर येण्यासाठी गणेश डोंगरे आणि त्याचे साथीदार वाट पाहत होते. यावेळी अश्विनी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ लाईव्ह केला. यामध्ये अश्विनी दाखवतेय की, ड्रायव्हर लोकांनी गाड्या उभ्या केल्या आहे, काही लोक इथं बनवून खात आहे. कारखान्यावर गाडी लवकर खाली होत नाही, त्यामुळे इथंच थांबवं लागतंय. जर गाडी नसेल तर ५०० रुपये दंड लागतो. आमची तर ऊसाची बैलगाडी आहे. असं सांगत होती, तितक्यात ज्या ठिकाणी गणेश बसला होता, तिथे उसाची ट्रॉली उलटली. उसाच्या ट्रॉली खाली दबून गणेश डोंगरेचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रिलस्टार गणेश डोंगरेंच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आंदोलनाची वेळ, अश्विनी ढसाढसा रडली, अजितदादांचा कारखाना पाडला बंद
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement