Jacob Bethell : टीम इंडियाला घाम फोडला, आता IPL मध्ये धमाका करणार, जेकब बेथल कुणाकडून खेळणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जेकब बेथलने वादळी शतक ठोकलं. टीम इंडियाला घाम फोडणारा हाच बेथल आता आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर 7 रननी रोमांचक विजय मिळवून टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने दिलेल्या 254 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेकब बेथलने एकट्याने किल्ला लढवला. बेथलने 48 बॉलमध्ये 105 रनची वादळी खेळी केली, यात त्याने 7 सिक्स आणि 8 फोर मारल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यातला हा सर्वाधिक स्कोअर आहे.
जेकब बेथलचं हे शतक टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यातलं दुसरं सगळ्यात जलद शतक होतं. 22 वर्षांच्या बेथलने फक्त 45 बॉलमध्ये त्याचं शतक ठोकलं. 19 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर सिक्स मारून बेथलने त्याचं शतक पूर्ण केलं, पण शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला आणि टीम इंडियाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
जेकब बेथलचं 45 बॉलमध्ये ठोकलेलं हे शतक टी-20 वर्ल्ड कपच्या नॉकआऊट सामन्यातलं दुसरं जलद शतक होतं. या शतकाच्या एक दिवस आधीच टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊटमधलं सगळ्यात जलद शतक फिन ऍलनने झळकावलं होतं. न्यूझीलंडच्या फिन ऍलनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये 33 बॉलमध्ये नाबाद 100 रन केले.
advertisement
बेथल आयपीएलमध्ये धमाका करणार
वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाला घाम फोडणारा जेकब बेथल पुढचे दोन महिने भारतामध्ये आयपीएल खेळणार आहे. ऑलराऊंडर असलेला बेथल आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीकडून खेळणार आहे. बेथल 2025 साली आयपीएल जिंकलेल्या आरसीबीचाही भाग होता, यानंतर या मोसमासाठी आरसीबीने बेथलला 2.60 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 11:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jacob Bethell : टीम इंडियाला घाम फोडला, आता IPL मध्ये धमाका करणार, जेकब बेथल कुणाकडून खेळणार?









