महाराष्ट्रात जुनी गाडी वापरणे आता महागात पडणार, टॅक्समध्ये दुप्पट वाढ, कोणत्या वाहनांना नियम लागू?
- Published by:Sachin S
Last Updated:
महायुती सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प जनतेसमोर मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये वाहनांसाठी २ महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या चालून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्याांसाठी २ लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, ऑटो इंडस्ट्रीमध्येही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी आता जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढवण्यात आलाआहे. त्यामुळे आता जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर ३० टक्क्यांपर्यंत जास्त टॅक्स भरावा लागणार आहे.
महायुती सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प जनतेसमोर मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये वाहनांसाठी २ महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. जुन्या आणि जास्त प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर ग्रीन टॅक्स वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे जे लोक आपली जुनी गाडी स्क्रॅपमध्ये देणार आहे, त्यांना त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. सध्या सगळीकडे प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिल्लीमध्ये १५ वर्ष जुन्या गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याच धर्तीवर राज्य सरकारने वाहनांना थेट बंदी तर घातली नाही पण ग्रीन टॅक्समध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता जुनी गाडी आढळली तर ग्रीन टॅक्सचा दंड बसणार आहे.
advertisement
दुप्पट भरावा लागणार टॅक्स
यापुढे राज्यामध्ये ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहे त्यांना ग्रीन टॅक्स दुप्पट भरावा लाागणार आहे. विशेष म्हणजे, BS-4 किंवा त्यापेक्षा जुनी गाडी असेल तर 'एमिशन नॉर्म्स' असलेल्या खासगी वाहनांवर हा टॅक्स वाढवण्यात आलाा आहे. या गाड्या प्रदूषण जास्त करतात म्हणून हा निर्णय घेतला आहे.
नवीन स्क्रॅप पॉलिसी
तसंच, जुनी गाडी जर स्क्रॅपसाठी द्यायची ठरली तर ज्यांच्याकडे BS-4 किंवा त्यावरील गाडी स्क्रॅप केली आणि नवीन गाडी खरेदी केली तर जवळपास १६ टक्के टॅक्स सवलत मिळणार आहे. नवी गाडी खरेदी करताना हा मोटार वाहन करात ही सवलत दिली जाणार आहे. तसंच, ज्यांच्याकडे BS-3 किंवा त्यापेक्षा जुनी गाडी असेल तर स्क्रॅपलाा दिली तर सुमारे ३० टक्क्याांपर्यंत सवलत मिळेल. त्याामुळे आता नवीन गाडी घेताना जुनी गााडी दिली तर एकीकडे सरकारकडून सवलत आणि वाहन कंपन्यांकडून ऑफर मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल.
advertisement
वाहनधारकांना किती बसणार फटका?
जर तुमच्याकडे १५ ते २० वर्ष जुनी गाडी असेल तर आता तुम्हाला दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. अशा गााड्यांना स्क्रॅपमध्ये देण्याची आधीच मोहोर उमटलेली असते, पण तरीही अशा गाड्याा चालवणाऱ्यांना आता दंड भरावा लागणार आहे. तसंच, जर नवीन गाडी घ्यायची असेल तर त्यांना इथं फायदा आहे. जुनी गाडी स्क्रॅपमध्ये देताना सरकारकडूनच सवलत मिळणार आहे,त्यामुळे ही फायद्याची डील असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 10:49 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
महाराष्ट्रात जुनी गाडी वापरणे आता महागात पडणार, टॅक्समध्ये दुप्पट वाढ, कोणत्या वाहनांना नियम लागू?









