निसर्गाच्या लहरीपणाने बटाटा शेती उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेले पिक वाया, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील शेतकरी पवन डकले गेल्या अनेक वर्षांपासून बटाटा शेती करत आहे. दरवर्षी त्यांना बटाटा शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असते.
छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील शेतकरी पवन डकले गेल्या अनेक वर्षांपासून बटाटा शेती करत आहे. दरवर्षी त्यांना बटाटा शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असते. त्यामुळे यंदा देखील त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये बटाटा पिकाची लागवड केली. यासाठी जवळपास बियाणं आणि रासायनिक खते मिळून 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे. गेल्या वर्षी त्यांना या शेतीतून 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणा आणि परतीच्या पावसामुळे बटाटा पिक सडले आणि उत्पादन घटले परिणामी शेतीला लावलेला खर्च देखील निघाला नाही.
त्यामुळे बियाणं आणि रासायनिक खतांचा भाव शासनाने कमी करावा अशी मागणी पवन डकले यांनी केली. अतिवृष्टी तसेच दिवाळीनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगरगाव कवाड येथील पवन डकले हे नियमित बटाटा या पिकाचे उत्पादन घेत असतात. तसेच यंदा त्यांना बटाटा पिकाचे खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचा खर्च आला यासह रासायनिक खते, ड्रीप असा एकूण खर्च 70 हजार रुपये लागला आहे. मात्र बाजारात बटाट्याला भाव नाही. 7 ते 8 रुपये प्रति किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. त्यातच पुन्हा आता परतीचा पावसाचा फटका देखील उमटून पडला असल्याने बटाटे सडके असून 70 ते 75 हे पीक खराब झालं असल्याचं डकले यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
शेतीला लावलेला खर्चही पाण्यात
बटाटा पिकातून सध्या तरी नफ्यासारखं काही नाही मात्र नुकसान आहे. दरवर्षी पाहिलं तर बियाणं 1800 ते 2000 हजार रुपये दराने मिळतं. मात्र यंदा पुणे येथील मंचर या ठिकाणाहून 5000 हजार रुपये दराने बियाणं खरेदी केलं आहे. सध्यातरी या बटाटे शेतीतून 30 ते 35 हजार उत्पन्न मिळेल, म्हणजे या शेतीला लावलेला खर्च देखील निघाले कठीण झाले. त्यामध्येच पुन्हा बटाटे पिकासह आदी पिकांना लागणारे रासायनिक खतांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे शासनाने लक्ष देऊन रासायनिक खतांचे व बियाणांचे भाव कमी करावे असे देखील डकले यांनी म्हटले आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 6:53 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
निसर्गाच्या लहरीपणाने बटाटा शेती उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेले पिक वाया, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान










